'पद्मावती' चित्रपटावर बिहारमध्ये बंदी; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

सध्या चर्चेत असलेला आणि अत्यंत वादग्रस्त ठरलेला चित्रपट 'पद्मावती'ला बिहारमध्ये 'नो एण्ट्री' करण्यात आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 28, 2017, 08:19 PM IST
'पद्मावती' चित्रपटावर बिहारमध्ये बंदी; मुख्यमंत्र्यांचा निर्णय title=

पटना : सध्या चर्चेत असलेला आणि अत्यंत वादग्रस्त ठरलेला चित्रपट 'पद्मावती'ला बिहारमध्ये 'नो एण्ट्री' करण्यात आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे.

'पद्मावती'वर बंदीची तलवार लटकती

'पद्मावती' या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनीच केली आहे. बिहारनंतर राजस्थान, गुजरात उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश आदी राज्यांतही चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदीची तलवार लटकत आहे.

...तोपर्यंत बिहारमध्ये 'पद्मावती'ला 'नो एण्ट्री'

दरम्यान, नितीश कुमार यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत बिहारमधील सर्व पक्ष मान्यता देत नाहीत तोपर्यंत 'पद्मावती'वर बिहारमध्ये बंदीच राहील. बिहारचे क्रिडामंत्री कृष्ण कुमार ऋषी यांनी म्हटले आहे की, चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये जोपर्यंत हटवली जात नाहीत तोपर्यंत राज्यात चित्रपट प्रदर्शीत होऊ दिला जाणार नाही.

न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना सुनावले

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने 'पद्मावती' प्रकरणावर मुख्यमंत्र्यांना कानपीचक्या दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नितीश कुमार यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कोणत्याही प्रकारे चित्रपटावर बंदी घालू शकत नाहीत, असे न्यायालयाने म्हटले होते. तसेच, मुख्यमंत्र्यांनी चित्रपटविरोधी वातावरण बनवू नये असेही न्यायालयाने म्हटले होते. कठोर शब्दात सुनवताना न्यायालयाने म्हटले होते की, जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तिंनी आपल्या शब्दांवर काळजीपूर्वक ध्यान द्यायाल हवे सेन्सॉर बोर्डाचा निर्णय येत नाही तोपर्यंत कोणही अशा प्रकारे टीप्पणी करणे योग्य नसल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.