close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

देशातील आरक्षण कोणीही रद्द करू शकत नाही- नितीश कुमार

समाजातील उपेक्षित जाती समूहांसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती.

Updated: Nov 1, 2018, 10:51 AM IST
देशातील आरक्षण कोणीही रद्द करू शकत नाही- नितीश कुमार

पाटणा: देशातील मागासवर्गीय घटकांना देण्यात आलेले आरक्षण कोणीही रद्द करू शकत नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ठणकावून सांगितले. ते गुरुवारी संयुक्त जनता दलातर्फे (जेडीयू) गया येथे आयोजित करण्यात आलेल्या अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, आरक्षण कायम राहण्यासाठी मी कोणतेही बलिदान द्यायला तयार आहे. 

काही लोकांना समाजात तणाव आणि दरी निर्माण करायची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेच्या मसुद्याला संविधान विधानसभेने मंजुरी दिली होती. यामध्ये समाजातील उपेक्षित जाती समूहांसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. जेणेकरून ते मुख्य प्रवाहात सामील होतील. 

त्यामुळे देशातील कोणालाही हे आरक्षण रद्द करायचा हक्क नाही. माझ्यासारखे लोक आरक्षणासाठी कोणतेही बलिदान द्यायला तयार आहेत. जे लोक आरक्षण रद्द करण्याची भाषा करतात त्यांनी यासाठी कोणतेही प्रयत्न केले नव्हते, असेही यावेळी नितीश कुमार यांनी सांगितले.