केवळ 1 रुपयामध्ये ऑक्सिजन कॅसंट्रेटर उपलब्ध, फक्त एक ईमेल पाठवा

अर्ज करणाऱ्यांनी रूग्णांचे आधार कार्ड, ऑक्सिजन सेचुरेशन रिपोर्ट, कोरोना रिपोर्ट, डॉक्टरांची चिठ्ठी आणि कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे ओळखपत्र आणि पुरावा म्हणून मोबाईल क्रमांक द्यावा लागेल.

Updated: May 11, 2021, 09:38 PM IST
केवळ 1 रुपयामध्ये ऑक्सिजन कॅसंट्रेटर उपलब्ध, फक्त एक ईमेल पाठवा

मुंबई : कोरोना महामारीच्या या परिस्थितीत, ऑक्सिजन ही लोकांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट बनली आहे आणि त्याची कमतरता सतत वाढत आहे. ऑक्सिजनमुळे बर्‍याच हॉस्पिटलमध्ये रूग्णांचा मृत्यू झाल्याचेही बातमी समोर आली आहे. परंतु दोन स्वयंसेवी संस्थांनी अशी घोषणा केली आहे, ज्याद्वारे आपण केवळ एका रुपयात ऑक्सिजन मिळवू शकता. यासाठी आपल्याला फक्त एक ईमेल करावा लागणार आहे.

नोएडा येथील चॅलेंजर्स ग्रुप आणि व्हॉईस ऑफ स्लम या स्वयंसेवी संस्था, शहरातील कोरोनाची लागण झाल्याने घरीच उपचार घेत असलेल्यांना मदत करण्यासाठी पुढे आल्या आहेत. या संस्था आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना अवघ्या एका रुपयात ऑक्सिजन कॅसंट्रेटर उपलब्ध करुण देत आहेत. एका मीडिया अहवालानुसार, हे ऑक्सिजन कॅसंट्रेटर 10 ते 15 दिवस उपलब्ध केले जातील.

ऑक्सिजन केंद्रासाठी या ईमेल आयडीला संपर्क साधा

व्हॉईस ऑफ स्लमचे संस्थापक देव प्रताप यांनी माहिती दिली की, त्यांनी आता 50 कॅसंट्रेटरची ऑर्डर दिली आहे.  तसेच आणखी मोठ्या संख्येने कंसंट्रेटर ऑर्डर करण्याचे आदेश दिले गेले आहेत.

चॅलेंजर्स ग्रुपचे अध्यक्ष प्रिन्स शर्मा म्हणाले की, ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे, असे गरजू लोकं ऑक्सीजन कॅसंट्रेटरसाठी चॅलेंजर्स ग्रुपच्या मेल आयडी Challengersgroupofficial@gmail.com आणि व्हॉईस ऑफ स्लमचा मेल आयडी Info@voiceofslum.org वर संपर्क साधू शकतात.

अर्ज करणाऱ्यांनी रूग्णांचे आधार कार्ड, ऑक्सिजन सेचुरेशन रिपोर्ट, कोरोना रिपोर्ट, डॉक्टरांची चिठ्ठी आणि कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे ओळखपत्र आणि पुरावा म्हणून मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. स्वयंसेवी संस्थेकडून कागदपत्र पडताळणीनंतर लोकांना ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यात येईल.

भारताला इतर देशांकडून मदत

गेल्या दोन दिवसांपासून देशात कोव्हिडच्या नवीन केसेसमध्ये किंचित घट झाली आहे. परंतु नवीन रुग्णांची संख्या अद्याप 3 लाखाहून अधिक आहे आणि कमी नमुने तपासल्या कारणामुळे देखील ही संख्या कमी असू शकते.
देशात सर्वात जास्त नवीन प्रकरणे आता कर्नाटकमध्ये नोंदविली गेली आहेत, ज्यात 39 हजार 305 नवीन प्रकरणे आणि 596 लोकांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकने नवीन कोरोना केसेसमध्ये महाराष्ट्राला मागे सोडले आहे. सोमवारी, महाराष्ट्रात 37 हजार 236 नवीन प्रकरणे आणि 549 मृत्यूंची नोंद झाली आहे.

कोरोनाच्या या गंभीर परिस्थितीत, इतर देशांकडून भारताला सतत मदत मिळत आहे. काल भारत सरकारने माहिती दिली होती की, भारताला 6 हजार 738 ऑक्सीजन कॅसंट्रेटर 3 हजार 856 ऑक्सीजन सिलेंडर, 16 ऑक्सीजन जेनरेशन प्लांट, 4 हजार 668 वेंटिलेटर/बाई पीएपी/सी पीएपी आणि 3 लाखपेक्षा जास्त रेमडेसिविर इंजेक्शन इतर देशातून पुरवण्यात आले आहे.