नवी दिल्ली : समुद्री क्षेत्रांत पाणबुडे किंवा मानवरहित लहान पाणबुड्यांमधून होणारे हल्ले आता अधिक सक्षमपणे रोखता येणार आहेत. कारण हे हल्ले रोखण्यााची क्षमता असणारे 'सोनार' आता पहिल्यांदाच देशात बनविले जाणार आहेत.
ही यंत्रणा नौदलासाठी डोळा आणि कानाचे काम करते. नौदलामार्फत या यंत्रणेची मोठ्या प्रमाणात खरेदी होणार असून जवळजवळ सर्वच बोटींमध्ये ही कार्यरत होणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.
अत्यंत हलके असल्याने, ती एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवता येते. त्याचे नाव पोर्टेबल पाणबुडया शोध सोनार (पीडीडीएस) आहे. याच्या पुरवठ्यासाठी टाटा पॉवर SED सोबत एक करार केला आहे.
पहिल्यांदा एका भारतीय कंपनीने हे सोनार बनवणार आहे. सरकारच्या 'मेक इन इंडिया' धोरणानुसार, हे सोनार बंगलोरमध्ये तयार केले जातील. या साठी, इस्रायली कंपनी DSIT चे तंत्रज्ञान असणार आहे. आतापर्यंत नेव्हीच्या गरजेसाठी हे सोनार आयात करण्यात आले.
भारतीय लष्कराला ६० शॉर्ट-रेंज रिमोट पायलट एअर क्राफ्ट सिस्टम्स खरेदी करणार आहेत. यामूळे दिवस रात्र मोठ्या क्षेत्रांवर हवाई मार्गातून पाळत ठेवता येणार आहे. हि यंत्रणा सैनिकांना कोणत्याही ऑपरेशनवेळी योग्य वेळ इलेक्ट्रॉनिक डेटा आणि फोटो देऊ शकणार आहे.
ही प्रणाली २०० किमीच्या रेंजमध्ये असावी आणि दर १० तासांनी उड्डाण घेण्याची क्षमता असावी अशी नौदलाची अपेक्षा आहे. या माहितीसाठी गुरुवारी विनंती करण्यात आली. भारतीय उद्योजक ही प्रणाली विकसित करतील असे यामध्ये म्हटले आहे. करारावर स्वाक्षरी करण्याच्या दोन वर्षांमध्ये यंत्रणेचा पुरवठा होणार आहे.