नवी दिल्ली : केंद्रीय वस्त्रउद्योग मंत्री स्मृती इराणी यांना आणखी एक झटका लागला आहे. नॅशनल इंस्टीट्यूट फॉर ट्रांसफॉर्मिंग इंडियातून (नीती आयोग) त्यांना हटवण्यात आलं आहे. येथे त्या विशेष आमंत्रित सदस्य होत्या. त्यांच्या स्थानी आता मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना विशेष आमंत्रित सदस्य बनवलं जाणार आहे. कॅबिनेट सचिवालयाने पत्रक जारी करत नीती आयोगात बदल केल्य़ाची माहिती दिली आहे. पंतप्रधानांनी देखील याला मंजुरी दिल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार आहेत.
स्मृती इराणी जेव्हा मानव संसाधन विकास मंत्री झाल्या तेव्हा त्यांना नीती आयोगात सदस्यत्व दिलं गेलं होतं. त्यांचं मंत्रालय बदल्यानंतर त्या नीती आयोगात विशेष सदस्य म्हणून कार्यरत होत्या. पण आता ते देखील त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं आहे.
मीडिया रिपोर्टसनुसार स्मृती इराणी यांच्या जागी प्रकाश जावडेकर यांना सदस्य म्हणून नियुक्त केलं गेलं आहे. प्रकाश जावडेकर सध्या मानव संसाधन विकास मंत्री देखील आहेत. राव इंद्रजीत सिंह यांना देखील नीती आयोगाचे माजी सदस्य म्हणून नियुक्त केलं गेलं आहे. हा निर्णय तेव्हा घेण्यात आला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी 17 जूनच्या गवर्निंग काउंसिलची बैठक घेणार आहेत.