मुंबई : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र लसीकरण सुरू आहे. लसीकरणासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे. रजिस्ट्रेशन करताना स्वतःची वैयक्तिक माहिती देण्यास काही चूक झाली असेल तर घबरण्याचे काही कारण नाही. तुम्ही ती चूक दुरूस्त करू शकता. तर जाणून घ्या CoWin पोर्टलवरून तुम्ही कशा प्रकारे चूक दुरूस्त करू शकता. कोरोना व्हॅक्सिन घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करताना नाव, जन्म तारीख किंवा लिंग चुकीचे लिहिलं असेल तर दुरूस्त करू शकता.
Now you can make corrections to your name, year of birth and gender on your Cowin vaccination certificates if inadvertent errors have come in. Go to https://t.co/S3pUoouB6p and Raise an Issue. @mygovindia @CovidIndiaSeva @MoHFW_INDIA @GoI_MeitY @_DigitalIndia #IndiaFightsCorona pic.twitter.com/W32yUGr8Jx
— Aarogya Setu (@SetuAarogya) June 8, 2021
सर्टिफिकेट (Vaccine Certificate)वर देखील माहिती चुकीची असल्यास तुम्ही CoWin पोर्टलवरून माहितीमध्ये बदल करू शकता. पण तुम्ही फक्त एक वेळाच माहिती अपडेट करू शकता. त्यानंतर तुम्ही अपडेट सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.
माहितीमध्ये कशी कराल दुरूस्ती
- सर्वप्रथम CoWin पोर्टल (cowin.gov.in)ला भेट द्या.
- त्यानंतर मोबाईल नंबर टाकून लॉग-इन करा
- अकाउंड डिटेल खाली असलेल्या Raise an Issue वर क्लिक करा.
- मेंबरचं नाव सिलेक्ट झाल्यानंतर Correction in Certificateवर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्ही नाव, जन्म तारीख किंवा लिंग यामध्ये बदल करू शकता.