राज्यात राजकीय भूकंप | 3 वर्ष पूर्ण, अख्ख्या मंत्रिमंडळाचा तडकाफडकी राजीनामा

देशाच्या राजकारणात सध्या राज्यसभा निवडणुकीची लगबग सुरु आहे. या गडबडीत राजकीय वर्तुळातून अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. 

Updated: Jun 4, 2022, 06:18 PM IST
राज्यात राजकीय भूकंप |  3 वर्ष पूर्ण, अख्ख्या मंत्रिमंडळाचा तडकाफडकी राजीनामा title=

भुवनेश्वर : देशाच्या राजकारणात सध्या राज्यसभा निवडणुकीची लगबग सुरु आहे. या गडबडीत राजकीय वर्तुळातून अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. राजकारणात भूकंप घडला आहे. मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री मंत्रिमंडळात मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याची कुजबुज सुरु होती. यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आता रविवारी 5 जूनला आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. (odisha all ministers of cm naveen patnaiks cabinet resign new ministers will be oathtaking in 5 june)

हा सर्व धक्कादायक प्रकार ओडिशात घडलाय. राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक मंत्रिमंडळात बदल करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. तसेच सूर्यनारायण पात्रो यांनी ओडिसा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर सर्व मंत्री राजीनामा देत जबाबदारीतून मुक्त झाले.

सत्ताधारी बीजू जनता दलाला (BJD) 29 मे ला सत्तेत येऊन 3 वर्ष पूर्ण झाली. यानंतर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं.  

या दरम्यान सतत वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या मंत्र्यांमुळे सरकाच्या प्रतिष्ठेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. परिणामी शनिवारी सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला. सर्व मंत्र्यांनी आपला राजीनामा उपसभापतींना सोपवला. आता म्हटलं जातंय की रविवारी दुपारी 12 दरम्यान शपथविधी होऊ शकतो.