नवी दिल्ली : सध्या लग्न समारंभाचे अनेक किस्से सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आता देखील एक धक्कादायक बाब समोर येत आहे. लग्न झाल्यानंतर नवव्या दिवशी नवरी घर सोडून निघून गेली. ती फक्त घर सोडून नाही तर नवऱ्याचे पैसे आणि सोन्याचे दागिने घेवून पळून गेली. लग्नात नवरा-नवरी एकमेकांना सात जन्म साथ देण्याचा वचन देतात. पण ही नवरी तर नवव्या दिवशीच सर्व वचन विसरून पळून गेली. आता पोलीस त्या नव्या नवरीचा शोध घेत आहेत.
थबुकडा भागातील निवासी भोमाराम सोनीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. भोमारामचं लग्न 4 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील ठाणे याठिकाणी राहणाऱ्या रोणुकासोबत झालं. हे लग्न जुळवण्यासाठी काही लोकांनी मदत केली होती. भोमारामसोबत लग्न जुळवण्याठी त्यांनी तब्बल 10 लाख रूपये घेतले होते. पण लग्न झाल्यानंतर आठ दिवसांत म्हणजे 12 ऑगस्ट रोजी घरातून पळून गेली. भोमारामने पत्नीला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मोबाईल संपर्क साधण्याचा देखील प्रयत्न केला.
पण पत्नीला होणत्याही प्रकारचा संपर्क होवू शकला नाही. नंतर भोमारमने त्याचे कपाट पाहिले आणि त्यात ठेवलेले सोन्या -चांदीचे दागिने आणि 42 हजारांची रोकड गायब होती. भोमारामने पोलिसांना सांगितले की, ती बावरला येथील रहिवासी विक्रम दास संत यांना भेटायला जात होती. विक्रम तिला सांगायचा की तो तिचं लग्न महाराष्ट्रातील मुलासोबत लग्न लावून देईल.
त्यानंतर पाली येथील रहिवासी पदमा शर्मा आणि पप्पू सिंह, गुलजार आणि करन जैन यांनी लग्न लावून देण्याचं आश्वासन तिला दिले. लग्नासाठी 2 लाख 10 हजार रूपये लग्न खर्च करण्यासाठी सांगितलं. भोमाराम ही गोष्ट त्याच्या कुटुंबातील सदस्यांना सांगितले, ज्यावर कुटुंबाने सहमती दर्शवली. 4 ऑगस्ट रोजी पैसे दिले आणि त्याच दिवशी आरोपीने रेणुकाचं लग्न एका मुलासोबत लग्न लावून. त्यानंतर जोधपूरच्या गणेश मंदिरात आणि कोर्टात लग्न झाले.
लग्नानंतर रेणुकाला मात्र भोमाकामसोबत पाठवण्यात आलं. लग्नानंतर रेणुका सतत त्या व्यक्तींना भेटण्यासाठी जायची. आरोपींच्या सहकार्याने रोणुका पळाली असल्याचा आरोप भोमारामने केला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.