अविश्वसनीय! फक्त 5 मिनिटात फुल्ल चार्ज! फास्ट चार्जिंगसाठी OLA ची हायटेक कंपनीत गुंतवणूक

Ola Electric invests in StoreDot: बंगळुरूमधील इलेक्ट्रिक कंपनी ओलाने मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर फास्ट चार्जिंग करण्यास मदत होणार आहे.

Updated: Mar 22, 2022, 12:03 PM IST
अविश्वसनीय! फक्त 5 मिनिटात फुल्ल चार्ज! फास्ट चार्जिंगसाठी OLA ची हायटेक कंपनीत गुंतवणूक title=

मुंबई : ओला इलेक्ट्रिकने इस्राइलची बॅटरी फर्म स्टोरडॉट (StoreDot) मध्ये गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीतून ओला कंपनीने स्कूटरची बॅटरीला आणखी मजबूती मिळणार आहे. बंगळुरूमधील इलेक्ट्रिक ओला कंपनीने एक परिपत्रक काढून ही घोषणा केली आहे.

इस्राइलची कंपनी स्टोरडॉमच्या मदतीतून ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटर फास्ट चार्जिंग होऊ शकतील. कंपनी एक्सएफसी बॅटरी टेक्निकच्या माध्यमातून फक्त 5 मिनिटात 0 ते 100 टक्के बॅटरी चार्जिंग होऊ शकते. परंतू या गुंतवणूकीनंतर ओलाकडे स्टोरडॉटच्या फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीअंतर्गत उत्पादन करण्याचा अधिकार असेल की नाही, कंपनीने अद्याप ह्या बाबीचा खुलासा केलेला नाही.

ओला ने आपल्या निवेदनात म्हटले की, स्टोरडॉटमध्ये गुंतवणूक केल्याने कंपनीला जागतिक बाजारात उत्पादनांचे प्रोमोशन सोपे होणार आहे.

भाविश अग्रवालने म्हटलं की...

ओलाचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी म्हटलं की, आमचे प्रयत्न इलेक्ट्रिक वाहनांना सर्वोत्तम बनवणे आहे. त्यामुळे या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने काम करणाऱ्या कंपन्यांसोबत आम्ही भागिदारी करणार आहोत. ओलाची ही नियोजित पहिलीच जागतिक गुंतवणूक आहे.

इलेक्ट्रीक दुचाकींची मागणी

येणाऱ्या दिवसांमध्ये ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सक्षम राहण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंगवर लक्ष केंद्रीत केल्याचे ओलाने म्हटले आहे.