२०१९ सालीही भाजपच्याच हाती सत्ता, अब्दुल्लांचं ट्विट

विरोधकांची एकी म्हणजे नुसता आभास असून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येईल, असे संकेत जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिलेत. 

Updated: Aug 8, 2017, 10:50 PM IST
२०१९ सालीही भाजपच्याच हाती सत्ता, अब्दुल्लांचं ट्विट title=

जम्मू : विरोधकांची एकी म्हणजे नुसता आभास असून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येईल, असे संकेत जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिलेत. 

'विरोधकांची एकता हे केवळ मिथ्य आहे... ही केवळ एक कोरी कल्पना आहे... २०१९ साली यामधला प्रत्येक जण स्वत:साठी एकटाच असेल आणि भाजपला पाच वर्षांची आणखी एक संधी मिळेल' असं त्यांनी म्हटलंय. 

गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीवरून सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी हे ट्वीट केलंय. 

यापूर्वी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालानंतरही त्यांनी ट्वीट करून २०१२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यास सांगितलं होतं.