कोरोना : उद्धव ठाकरेंच ओमर अब्दुल्लांकडून कौतुक

सोशल मीडियातूनही मुख्यमंत्र्यांच कौतुक 

Updated: Apr 6, 2020, 10:08 AM IST
कोरोना : उद्धव ठाकरेंच ओमर अब्दुल्लांकडून कौतुक

मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः महाराष्ट्रात कोरोनाबाधित रूग्णांचा संख्या वाढतोय. पण असं असलं तरीही राज्य सरकार खूप खंबीरपणे आणि संयमाने ही परिस्थिती हातावळ आहेत. अनेक समस्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खूप शांतपणे निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे. जनतेशी संवाद साधत त्यांना दिलासा देणं आणि परिस्थिती खूप संयमाने सांभाळल्यामुळे उद्धव ठाकरेंच खूप कौतुक होत आहे. अशाच जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला यांनी उद्धव ठाकरेंच कौतुक केलं आहे. 

ओमार अब्दुल्लांनी एका शब्दात ट्विट करून उद्धव ठाकरेंच कौतुक केलं आहे. उद्धव ठाकरेंच एक नवं रूप पाहायला मिळालं असं ओमार अब्दुल्लांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री या नात्याने जी परिस्थिती हाताळत आहेत ती खरंच कौतुकास्पद आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंच कौतुक होत आहे. लेखक जावेद अख्तर यांनी देखील ट्वीट करून उद्धव ठाकरेंच कौतुक केलं आहे.   प्रसिद्ध गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांनी मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. ट्विटरवर पोस्ट करत ते म्हणाले, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने कोरोनाबाबत स्पष्ट निर्देश देत आहेत, ते कौतुकास पात्र आहे. माझा सलाम.' 

जावेद अख्तर नेहमीच आपल्या परखड वक्तव्याबाबत ओळखले जातात. कोरोना व्हायरसमुळे सरकारने सर्व कार्यक्रमांवर त्याचप्रमाणे धार्मिक स्थळांवर बंदी आणली होती. तरी देखील अनेक ठिकाणी मशिदींमध्ये नमाज पठण सुरू असल्यावरुन टीका केली होती आणि मशिदी बंद करण्याची मागणी देखील केली होती.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x