OMG! विचित्र अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ, नेमकी चूक कोणाची?

हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा असा अपघात होण्यामध्ये नेमकी चूक कोणाची?

Updated: Feb 7, 2022, 02:15 PM IST
OMG! विचित्र अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ, नेमकी चूक कोणाची? title=

नवी दिल्ली :  कधी वेधळेपणामुळे तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघाताचे थरारक व्हिडीओ समोर येत असतात. पण कधीकधी विचित्र प्रकार घडतो ज्यामुळे अपघात होतो. एका विचित्र अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

आजकाल रस्ते अपघात ही सामान्य गोष्ट होत चालली आहे. काही वेळा आपल्या डोळ्यांसमोर विचित्र अपघात होतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहून शकता की एक युवक रस्त्यावरून जात होता. त्यावेळी समोरून सायकल येत होती. सायकलचा वेग जास्त होता. 

युवकाला जेव्हा समजलं की सायकल आपल्याला धडक मारणार तेव्हा तो वेगानं पळत रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याचवेळी अपघात टाळण्यासाठी सायकलवाला देखील प्रयत्न करतो. या दोन्हीमध्ये गडबड होते आणि शेवटी विचित्र प्रकारे अपघात होतोच. सायकल आणि युवकाची धडक होते. 

रस्त्यानं जाणाऱ्या युवकाची एवढीच चूक असते की तो वेगानं पळत जातो. त्यामुळे सायकल चालवणारा संभ्रमात पडतो. त्यामुळे हा अपघात होतो. या विचित्र अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याची कोणतीही माहिती मिळू शकली नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.