याला म्हणतात नशीब! रातोरात बनला स्टार मॉडेल

कोणाचं नशीब कसं बदलेल याचा नेम नाही.... 60 वर्षांचा मजूर बनला मॉडेल

Updated: Feb 16, 2022, 07:14 PM IST
याला म्हणतात नशीब! रातोरात बनला स्टार मॉडेल title=

नवी दिल्ली : नशीब खरंच कधी काय वेळ घेऊन येईल सांगता येत नाही. नशीबाची साथ असेल तर काहीही होऊ शकतं एका रात्रीमध्ये अगदी सेलिब्रिटी किंवा करोडपती देखील. वाचून एक क्षण थक्क व्हाल पण एका मजुराचं नशीब पालटलं आणि तो मॉडेल बनला. त्याच्या या यशाचं रहस्य आज जाणून घेणार आहोत. 

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हा मॉडेल खरं तर 60 वर्षांचा मजूर आहे. तो केरळच्या कोझिकोड या भागात राहातो. त्याचं नाव मम्मिका आहे. या मजुरावर एका फोटोग्राफरची नजर पडली आणि त्याचं नशीब फळफळलं. 

फोटोग्राफरने या मजुराला चांगले कपडे आणि चांगली स्टाईलने तयार केलं. त्यानंतर त्याचं वेगवेगळ्या ठिकाणी फोटोशूट केलं. त्याचा ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर व्हायरल होताच मागणी वाढली. या मजुराचा मेकओव्हर अनेक युजर्सना खूप आवडला. त्यांनी फोटोग्राफरचं खूप कौतुक केलं आहे.

मिम्मिकाने सध्या एका छोट्या फर्मसाठी प्रमोशनल शूट केलं आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका फोटोग्राफरची नजर या मजुरावर पडली. त्यानंतर या मजुराचं नशीब पालटलं. सध्या मिम्मिका स्थानिक लेव्हलवर मॉडेल म्हणून सध्या काम करत आहे. 

फोटोग्राफरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याचे फोटो शेअर केले त्यानंतर या मिम्मिकाला प्रसिद्धी मिळाली आहे. त्याने मिम्मिकाशी एक करारही केला. त्यानंतर मेकओव्हर केला. सध्या तो खूप जास्त सोशल मीडियावर हिट झाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by (@shk_digital)