चिंता वाढली, राजधानीत ओमायक्रोनचे 10 नवीन बाधित

Omicron variant : कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे.  त्यामुळे चिंता वाढली आहे.

Updated: Dec 17, 2021, 12:52 PM IST
चिंता वाढली, राजधानीत ओमायक्रोनचे 10 नवीन बाधित title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : Omicron variant : कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. राजधानी दिल्लीमध्ये ओमायक्रोनचे 10 नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत. त्यामुळे दिल्लीची चिंता वाढली आहे.

दिल्लीत ओमायक्रोन व्हेरिएंटचा धोका वाढताना दिसत आहे. राजधानी दिल्लीत ओमायक्रोन रुग्णांची एकूण संख्या 20 झाली आहे. दरम्यान, एक चांगली बातमी आहे की, या 20 पैकी एकूण 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबतची माहिती दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली. याबाबतची वृत्त एएनआयने दिले आहे.

देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत भर पडत होत आहे. देशातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा 97 वर पोहोचला आहे. (Omicron cases in India rise to 97 after 10 new cases reported)

आरोग्य मंत्रालयाने आज शुक्रवारी  जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत, एकूण  रुग्ण 3,47,26,049 आणि एकूण मृतांची संख्या 4,76,869 वर पोहोचली. देशात आज 7,886 इतकी नोंद झाली आहे. 24 तासांच्या कालावधीत सक्रिय COVID-19 प्रकरणांमध्ये 830 प्रकरणांची घट नोंदवण्यात आली आहे.

कोरोनाच्या सक्रिय प्रकरणे 86,415 आहेत. 391 नवीन मृत्यूंमध्ये केरळमधील 320 आणि महाराष्ट्रातील 19 जणांचा समावेश आहे. केरळमधील 320 मृत्यूंपैकी 36 मृत्यू गेल्या काही दिवसांत नोंदवले गेले आहेत.