मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. या धोकादायक विषाणूमुळे हजारो नागरिकांचा जीव गेला आहे, तर लाखो नागरिकांना कोरोना व्हायरसची लागन झाली आहे. दिलासादायक बातमी म्हणजे यातील काही रुग्ण बरे देखील होत आहेत. कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनमुळे हाल झाले ते म्हणजे हातावर पोट असणाऱ्यांचे, गरिबांचे आणि अन्नासाठी वनवन भटकणाऱ्या भिकाऱ्यांचे. पण लॉकडाऊन घोषित करणंही तितकचं महत्त्वाचं होतं. पण महामारीमध्ये प्रत्येकापर्यंत अन्न पोहोचेल अशी योजना सरकार आणि अनेक संस्थांकडून राबवली जात आहे.
तर या सर्व भीतीच्या परिस्थितीत पोलिस, डॉक्टर, नर्स आपल्या जीवाची पर्वा न करता नगरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहेत. सध्या एक मन हेलावून टाकणारा व्हिडिओ व्हायरल होत. तर हा व्हायरल होणार व्हिडिओ ओडिशाचा असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये एक महिला पोलिस कर्मचारी रस्त्यावर बसलेल्या एका महिलेला अन्न भरवताना दिसत आहे. सध्याची कठीण परिस्थिती पाहता पोलिसांच्या वर्दीमध्ये दडलेलं हे मायेचं रूप बरचं काही सांगून जात आहे.
मैं इन पुलिस वालों की ज़ुबान नहीं समझ पाया... पर इतना समझ गया कि वर्दी पहनते हुए इन्होंने जो शपथ ली थी, वो इन्हें ज़ुबानी याद है. Respects. pic.twitter.com/YQpbZ6HgIA
— Manoj Muntashir (@manojmuntashir) April 10, 2020
ट्विटर वर हा व्हिडिओ मनोज मुंटाशीर नावाच्या एका व्यक्तीने पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये 'या पोलिसांचे शब्द मला कळाले नाहीत. पण एवढं मात्र नक्की कळालं की वर्दी घालताना त्यांनी जी शपथ घेतली होती, ती शपत ते पूर्ण करत आहेत.' या कॅप्शनच्या माध्यमातून मनोज मुंटाशीरने पोलिसांप्रती आदर देखील व्यक्त केला आहे.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवाय पोलिसांच्या या कार्यावर कौतुकाचा वर्षाव देखील होत आहे. तर काही नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर टीका देखील केली आहे. पोलिस त्या महिलेला का भरवत आहेत? असे प्रश्न देखील नेटकरी उपस्थित करत आहेत.