Kedarnath Yatra : मित्रांनी आवाज दिला पण... हेलिकॉप्टरच्या पंख्याची धडक बसल्याने अधिकाऱ्याचा मृत्यू

Kedarnath Helicopter Accident : या घटनेनंतर केदारनाथ धाममध्ये शोककळा पसरली आहे. या भीषण अपघातात आपला जीव गमावलेले अमित सैनी यांची UCADA मध्ये वित्त नियंत्रक म्हणून नियुक्त होते.

आकाश नेटके | Updated: Apr 24, 2023, 05:59 PM IST
Kedarnath Yatra : मित्रांनी आवाज दिला पण... हेलिकॉप्टरच्या पंख्याची धडक बसल्याने अधिकाऱ्याचा मृत्यू title=

Kedarnath Helicopter Accident : उत्तराखंडमधील (uttarakhand) केदारनाथमध्ये चारधाम यात्रेला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनेक भाविकांनी उत्तराखंडकडे धाव घेतली आहे. मात्र केदारनाथ (Kedarnath)यात्रा सुरू होण्यापूर्वीच घडला मोठा अपघात घडला आहे. रविवारी हेलिकॉप्टरच्या (Helicopter) पंख्याच्या कचाट्यात येऊन एका अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमित सैनी असे या अधिकाऱ्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. अमित सैनी हे उत्तराखंडचे नागरी विमान वाहतूक नियंत्रक होते. अमित सैनी यांची मान कापली गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

ट्रायल सुरु असताना लॅंडिंग दरम्यान हा भीषण अपघात झाला. लँडिंग दरम्यान, अमित सैनी हे हेलिकॉप्टरजवळ जात होते. त्याचवेळी हेलिकॉप्टरच्या टेल रोटरचा (मागील पंखा) सैनी यांना जोरदार धक्का लागला. त्याचे त्यांचे मान कापली गेली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात झाला तेव्हा उत्तराखंड सिव्हिल एव्हिएशनचे व्यवस्थापकीय संचालक हेलिपॅडवर उपस्थित होते. या भीषण अपघातानंतर एकच खबळबळ उडाली. दरम्यान, 2010 मध्येही हेली कंपनीतील एका कर्मचाऱ्याची मान हेलिकॉप्टरच्या ब्लेडने कापल्याने धक्कादायक मृत्यू झाला होता.

केदारनाथ मंदिराचे दरवाजे 25 एप्रिलपासून उघडणार आहेत. याबाबत उत्तराखंड प्रशासन जोरदार तयारी करत आहे. यात्रेदरम्यान यात्रेकरूंच्या सोयीसाठी हेलिकॉप्टर उपलब्ध असणार आहे. यावेळी केदारनाथ धामसाठी डीजीसीएने यावेळी नऊ हेलिकॉप्टरला परवानगी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणांहून केदारनाथपर्यंत हेलिकॉप्टरने जाण्याच्या चाचण्या सुरू आहेत. रविवारीसुद्धा युकाराचे अधिकारी अमित सैनी हे केदारनाथ धाम येथे हेलिकॉप्टरच्या तपासणीसाठी गेले होते त्याचवेळी हा अपघात झाला आणि त्यांचा जीव गेला. गेल्या वर्षीही एका हेलिकॉप्टरच्या अपघातात पायलट आणि सहा यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता.

नेमकं काय झालं?

पर्यटन सचिव रविशंकर, जिल्हा पर्यटन अधिकारी राहुल चौबे यांच्यासह अमित सैनी हे दुपारी अडीच वाजता केदारनाथला पोहोचले होते. त्यांनी येथे तयारीचा आढावा घेतला. यावेळी अमित सैनी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले. तिथून परतताना त्यांनी दोनदा मागे फिरून कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर सर्व अधिकारी पुन्हा हेलिपॅडवर आले आणि हेलिकॉप्टरच्या दिशेने निघाले. पण अमित सैनी अचानक हेलिकॉप्टरच्या मागच्या दिशेने जाऊ लागले. अनेकांनी त्यांना तसे करू नका असे सांगितले, पण हेलिकॉप्टरच्या आवाजात त्यांना ऐकू गेले नाही आणि ते अपघाताला बळी पडले.

याआधीही घडलेत भीषण अपघात

12 जून 2010 - केदारनाथ बेस कॅम्पमध्ये प्रभातम हेली कंपनीच्या हेलीकॉप्टरच्या पंख्याने मान कापल्याने एकाचा मृत्यू झाला होता.

21 जून 2013 - मदत कार्यासाठी गेलेल्या एका खासगी कंपनीच्या हेलिकॉप्टरचा  चाटीजवळ अपघात होऊ पायलटचा मृत्यू झाला होता.

25 जून 2013 - हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळल्याने 20 सैनिक शहीद झाले होते. मृतांमध्ये हवाई दलाचे 2 पायलट, एनडीआरएफचे 9 सदस्य आणि आयटीबीपीचे 6 सैनिक तसेच पाच क्रू-मेंबरर्सचा समावेश होता.

28 जून 2013 - केदारनाथपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गरुडचट्टीजवळ खासगी हेलिकॉप्टर कोसळले होते. या अपघातात पायलट आणि 3 जणांचा मृत्यू झाला होता.