OnePlusचा पॅन्टच्या खिशात स्फोट, या व्यक्तीची काय अवस्था झाली पाहा फोटो

या व्यक्तीने ट्विट करून आपला कंपनीवरील राग व्यक्त केला आहे.

Updated: Nov 10, 2021, 02:11 PM IST
OnePlusचा पॅन्टच्या खिशात स्फोट, या व्यक्तीची काय अवस्था झाली पाहा फोटो title=

मुंबई : OnePlus Nord 2 पुन्हा एकदा चर्चेत आहे. परंतु ते चांगल्या नाही तर निगेटीव्ह कारणांमुळे. या वर्षी पुन्हा एकदा OnePlus Nord 2 चा स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. यावेळी भारतातील धुळे येथे एका व्यक्तीसोबत ही घटना घडली आणि त्याचे फोटो सुहित शर्मा नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने शेअर केले. फोनच्या मालकाने हा फोना त्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात ठेवला होता. परंतु याचा अचानक मोठा स्फोट झाला, ज्यामुळे त्याचा भयानक परिणाम या फोनच्या मालकाला भोगावा लागला आहे. त्यामुळे या व्यक्तीने ट्विट करून आपला कंपनीवरील राग व्यक्त केला आहे.

युजरने ट्विट करून संताप व्यक्त केला

या युजरने चार फोटो शेअर करत लिहिले, 'वनप्लस तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तुमच्या स्मार्टफोनने काय केले ते पाहा. कृपया निकालासाठी तयार रहा. लोकांच्या जीवाशी खेळणे बंद करा. या मुलाला तुमच्यामुळे त्रास होत आहे. लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधा.'

शरीराची वाईट स्थिती

वापरकर्त्याने फोनच्या मागील बाजूची अनेक फोटो शेअर केले आहेत, जिथे असे दिसते की, फोन खालच्या डाव्या बाजूने जळाला आहे. फोन एका पारदर्शक TPU केसमध्ये ठेवण्यात आला होता आणि तो खालून फाटलेला दिसतो. दुर्दैवाने, या फोन मालकाच्या उजव्या मांडीवर मोठ्या जळलेल्या खुणा आहेत. वास्तविक, फोन मालकाच्या अंगावरची त्वचा जळली आहे.

घटनेनंतर लगेचच वनप्लसने सांगितले की, "आम्ही अशा घटनांना गांभीर्याने घेतो. आमची टीम वापरकर्त्यापर्यंत पोहोचली आहे आणि आम्ही अधिक तपास करण्यासाठी तपशील गोळा करण्याच्या प्रक्रियेत आहोत."

अद्यापतरी हा स्फोट कशामुळे झाला याचे कारण समोर आलेले नाही. कंपनी याचा तपास घेत आहे.