'या' Optical Illusion मध्ये तुम्हाला काय दिसलं? तुमचं उत्तर सांगणार तुमचं समाजातील महत्व

खरंतर लोकांचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा वेगळा असतो.

Updated: May 15, 2022, 03:55 PM IST
'या' Optical Illusion मध्ये तुम्हाला काय दिसलं? तुमचं उत्तर सांगणार तुमचं समाजातील महत्व title=

मुंबई : ऑप्टिकल इल्यूजन्समध्ये लपलेल्या गोष्टी शोधून काढणे हे खूप कठीण काम आहे. पण ते करण्यात एक वेगळीच मजा आहे. कारण यामाधील उत्तर शोधणं म्हणजे आपल्या डोक्याला  विचार करायला लावणं. तसेच जर का आपल्याला याचं उत्तर मिळालं, तर जो आनंद होतो, त्याची मजाच काही वेगळी असते. सध्या असेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे आपल्याला विचार करायला भाग पाडतात.

खरंतर लोकांचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा वेगळा असतो. एखादी सारखीच गोष्ट दोन व्यक्तींना वेगवेगळी दिसू शकते आणि यामागचं कारण आहे, व्यक्तीचा त्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन.

त्याच पद्धतीने तुम्हाला या व्हायरल होणाऱ्या फोटोत काय दिसतं, हे ठरवणार तुमचं व्यक्तीमत्व.

व्हायरल होणारा हा फोटो ओलेग शुप्लियाक यांनी रेखाटला आहे. तुम्हाला हा फोटो पहिल्यांदा पाहिल्यावर काय दिसले?  शुप्‍लीक यांच्या पेंटिंग या छुप्या आणि आकार बदलणार्‍या भ्रमांसाठी ओळखला जातात. आता हा फोटो देखील तुम्हाला बरेच काही सांगून जाईल.

आधी घोडा दिसला तर?

जर तुम्हाला या फोटोमध्ये पहिल्यांदाच घोडा दिसला, तर असे व्यक्ती हे आय कॉन्टॅक्टसाठी ओळखले जातात. त्यांचे डोळे फार बोलके असतात तसेच अशा लोकांकडे लोक लवकर अट्रॅक्ट होतात. जरी काही लोकांना ते आवडत नाही. पण काही लोकांना असंही वाटतं की, तुम्ही यातून अधिक घट्ट नातं निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात.

संगीतकार दिसला तर?

जर तुम्हाला या फोटोमध्ये पहिल्यांदा एखादा संगीतकार दिसला, तर लोक तुम्हाला तुमच्या विनोदबुद्धीसाठी ओळखतात असे समजा. जगाकडे पाहण्याचा तुमचा वेगळा दृष्टीकोन लोकांना तुमच्याकडे आकर्षित करतो. तुम्हाला भेटणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही आकर्षित करता. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही प्रत्येकाला तुमच्या वर्तुळात ठेवा.

जर तुम्हाला त्यात डोके दिसले तर

जर तुम्ही या फोटोमध्ये प्रथम दिसणारी गोष्ट एक मोठे डोके असेल, तर लोकांना तुमच्याबद्दल माहिती आहे, तसेच असे लोक कोणालाही आपल्या वागण्याने आकर्षीत करु शकतात. तुमचे हसणे आणि ऐकण्याची कला लोकांची मने जिंकते.