श्रीनगर : पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला. जम्मू-काश्मीर मध्ये पाकिस्तानने शुक्रवारी सीजफायर उल्लंघन केलं. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये युद्धबंदीचे उल्लंघन करत पाकिस्तानने गोळीबार केला. भारतीय सैन्यानेही या गोळीबारास प्रत्युत्तर दिले, परंतु पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारात भारतीय सैन्याचा एक जवान शहीद झाला आहे.
An Army man, Havildar Sambur Gurung, sustained critical injuries in ceasefire violation by Pakistan Army along the line of control in Nowshera Sector of Rajouri district in Jammu & Kashmir today. He later succumbed to his injuries: Lt Col Devender Anand, PRO Defence pic.twitter.com/IBWuW0cK8Q
— ANI (@ANI) July 10, 2020
मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात हवालदार सांबर गुरुंग गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पकिस्तानकडून या कुरापती सुरूच आहेत. याआधी देखील पाकिस्तानी सैन्यने सीमेवर असलेल्या भारतीय लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करत गोळीबार केला हेता. २२ जून रोजी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एका जवान देखील शहीद झाला होता.