जम्मू काश्मिरात पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक

सक्रीय असणाऱ्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला जम्मू कश्मीरमधून पोलिसांनी अटक केली आहे.  

ANI | Updated: Apr 24, 2019, 07:25 PM IST
जम्मू काश्मिरात पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी कारवाया करणाऱ्यासाठी सक्रीय असणाऱ्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला जम्मू कश्मीरमधून पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद वकार असे त्या दहशतवाद्याचे नाव आहे. तो गेल्या दीड वर्षापासून बारामुल्ला आणि लगतच्या परिसरातील तरुणांचे भारताविरोधात ब्रेनवॉश करण्याचे काम करत होता. जेणेकरुन पुन्हा दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. 

पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील मिआनवाई भागात राहणारा वकार हा जुलै २०१७ रोजी भारतात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे.  तेव्हापासून तो तेथील तरुणांना जाळ्यात ओढून त्यांचे ब्रेनवॉश करत होता. तो या माध्यमातून त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करत होता. तो गेल्या काही महिन्यांपासून गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर होता.

दरम्यान, बारामुल्ला हा दहशतवादी कारवायांपासून मुक्त झालेला जिल्हा आहे. मात्र, पुन्हा या जिल्ह्यात तो भूमिगत होऊन काम करत होता. त्यामुळे वकार हा बारामुल्लात पुन्हा दहशतवादी कारवाया घडविण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगण्यात येत आहे.