भारताविरोधात पाकिस्तानचा 'हनी ट्रॅप'; ISI एजंटला महिती पुरवणा-या दोघांना अटक

सीमेवरही भारतीय सैन्यापुढे निभाव लागत नसल्यानं आता पाकिस्तान 'हनी ट्रॅप'च्या माध्यमातून भारताची हेरगिरी करू पाहतोय. मात्र सुरक्षायंत्रणांनी पाकिस्तानची हाही डाव हाणून पाडलाय.

Updated: Sep 18, 2021, 08:35 PM IST
भारताविरोधात पाकिस्तानचा 'हनी ट्रॅप'; ISI एजंटला महिती पुरवणा-या दोघांना अटक title=

मुंबई : भारतानं पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात धडक मोहीम सुरू केल्यानं पाकिस्तानचा तीळपापड झालाय. पाकचा घुसखोरीचा प्लॅन फसतोय. सीमेवरही भारतीय सैन्यापुढे निभाव लागत नसल्यानं आता पाकिस्तान 'हनी ट्रॅप'च्या माध्यमातून भारताची हेरगिरी करू पाहतोय. मात्र सुरक्षायंत्रणांनी पाकिस्तानची हाही डाव हाणून पाडलाय.

भारताविरोधात कुरापती करणा-या पाकिस्तानचा आणखी एका नापाक डाव उधळला गेलाय. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISIनं सैन्यदलाची माहिती मिळवण्यासाठी हनी ट्रॅप लावल्याचं समोर आलंय. 

या हनी ट्रॅपची जबाबदारी रावळपिंडीतल्या तरूणींवर सोपवण्यात आलीय. याप्रकरणी जयपूरमधून दोन तरूणांना अटक करण्यात आलीय. सूत्रांच्या माहितीनुसार ISIच्या तरूणींनी त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्यांच्याकडून सैन्य दलाची महत्वाची माहिती गोळा केली. 

ही माहिती ISI एजंटला पुरवण्यात येत होती. मिलिटरी इंटेलीजन्सला याची माहिती मिळताच राजस्थान पोलिसांसह संयुक्त कारवाई करत त्यांनी या दोघांना अटक केलीय.

 भारतीय सैन्यदलाविषयी महत्वाची माहिती मिळवण्यासाठी पाकिस्ताननं याआधीही हनीट्रॅपचा प्रयोग केलाय. मात्र त्यांचे मनसुबे कधीच यशस्वी झालेले नाहीत. असे कुटील डाव खेळून पाकिस्तानच्या हाती काहीच लागणार नाही.