भरधाव कारनं 2 जणांना फुटबॉलसारखं उडवलं, अंगावर काटा आणणारा अपघाताचा थरारक व्हिडीओ

भयंकर अपघात ! भरधाव गाडी 10 फूट उडाली; दोघांना चिरडलं चौघांचा मृत्यू; पाहा थरकाप उडवणारा अपघात

Updated: Nov 30, 2021, 05:02 PM IST
भरधाव कारनं 2 जणांना फुटबॉलसारखं उडवलं, अंगावर काटा आणणारा अपघाताचा थरारक व्हिडीओ

खरड: भरधाव कारनं दोन जणांना अक्षरश: फुटबॉलसारखं उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भीषण अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही दृश्यं विचलित करणारी आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्याने भरधाव कारनं दोन जणांना अक्षरश: चिरडलं. या अपघातात 4 जणांना आपला जीव गमवावा लागला. 

रस्त्यावरून भरधाव जाणाऱ्या कारच्या चालकाचं कारवरील नियंत्र सुटलं. कार नियंत्रणाबाहेर गेली आणि तिने दोन जणांना चिरडलं. ही कार एवढ्या प्रचंड वेगात होती की तिने रस्त्यावरील डिव्हायडर तोडून पलिकडच्या लेनमधील दोन जणांना चिरडलं आहे. 

या भीषण अपघानंतर ही कार 10 फूट उंच उडाली आहे. दृश्यांवरून अपघाताची भीषणता कळू शकते. ही धक्कादायक घटना पंजाबच्या खरड इथे घडली आहे. रस्ता क्रॉस करत असताना दोन जण डिव्हायडरजवळ थांबले. 

या प्रवाशांचं दुर्दैव आणि त्यांना कल्पनाही नसावी एवढ्यात मृत्यूनं त्यांना गाठलं. नियंत्रण सुटलेल्या दोन रस्त्यावरील लोकांना चिडरलं. हे दोन लोक अक्षरश: फुटबॉल सारखे उडाले. या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे.