कपाळावर टिकली, ओठांवर लिपस्टिक, अन् साडी नेसून एअरपोर्ट मॅनेजरने संपवले आयुष्य, गूढ कायम

Pantnagar Airport Manager Found Dead: एअरपोर्ट मॅनेजरचा मृतदेह राहत्या घरी आढळला आहे. धक्कादायक म्हणजे त्याने महिलांचे कपडे परिधान केले होते. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 25, 2024, 02:41 PM IST
कपाळावर टिकली, ओठांवर लिपस्टिक, अन् साडी नेसून एअरपोर्ट मॅनेजरने संपवले आयुष्य, गूढ कायम title=
Pantnagar Airport Manager dressed in woman wear saree and lipstick found dead

Pantnagar Airport Manager Found Dead: उत्तराखंडच्या उधमन सिंहनगर जिल्ह्यात एअरपोर्ट ऑफिसरचा राहत्या घरी मृतदेह सापडला आहे. धक्कादायक म्हणजे या अधिकाऱ्याने महिलेचे कपडे परिधान केले होते तसंच, लिपस्टिकदेखील लावली होती. एअरपोर्ट अधिकाऱ्याचा अशा अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. राहत्या घरातच मृतदेह आढळल्याने अधिकाऱ्याने आत्महत्या केली असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.या प्रकरणी पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत तसंच, प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. 

मयत व्यक्तीची ओळख आशीष चौसाली अशी पटी आहे. ते एअर ट्रॅफिक कंट्रोलर म्हणून असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत होते. जेव्हा चौसाली यांचा मृतदेह सापडला तेव्हा त्यांच्या कपाळावर टिकली, ओठांवर लिपस्टिक लावलेली होती. तसंच, त्यांनी साडीदेखील नेसली होती. सोमवारी सकाळी त्यांच्या खोलीतच गळफास घेतलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह सापडला होता. उधम सिंह नगरचे एसपी मनोज कत्याल यांनी ही माहिती दिली आहे. 

तरुणाने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी वाटत आहे. पण मृतदेहाजवळ कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट सापडली नाही. खोलीत जाण्यापूर्वी चौसाली यांनी त्यांचा एक मित्र आणि नातेवाईकासोबत एकत्र डिनर केला हातो. पोलिस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा चौसाली यांची खोली आतून बंद होती. त्यानंतर दरवाजा तोडण्यात आला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

आशिष चौसाली यांचे मुळ गाव पिथौरागढ येथील आहे. त्यांची पत्नी शाळेत शिक्षिका आहे तर त्यांना अडीच वर्षांची एक मुलगीदेखील आहे. मयत व्यक्तीचा मोबाइल फोन पोलिसांनी पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे. जेणेकरुन या प्रकरणी तपास करण्यासाठी  काही महत्त्वाचे पुरावे मिळतील. 

आत्महत्या करण्यापूर्वी एअरपोर्ट मॅनेजरने अखेर महिलांचे कपडे परिधान करुन आणि मेकअप का केला होता, याचा तपास पोलिस करत आहेत. परिसरातही ही एकच चर्चा आहे. ब्लॅकमेलिंगने कंटाळून किंवा ऑनलाइन अॅक्टिव्हिटीमध्ये समावेश होता का? यादृष्टीनेही पोलिस तपास करत आहेत. अखेर असं काय झालं की तरुणाने अशा पद्धतीने आत्महत्या केली. पोलिस एअरपोर्ट मॅनेजरच्या ओळखीच्या व्यक्तींचा व त्याच्या नातेवाईकांकडेही चौकशी करत आहेत. नेमकं असं काय घडलं की या व्यक्तीने आत्महत्या केली याचा शोध घेतला जात आहे.