Parakram Diwas 2022 | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचं अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त इंडिया गेट येथे होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केलं. 

Updated: Jan 23, 2022, 07:53 PM IST
Parakram Diwas 2022 | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचं अनावरण title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त इंडिया गेट येथे होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केलं. देशाचे महान सुपुत्र सुभाषचंद्र बोस यांच्या कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून त्यांचा ग्रॅनाइटचा पुतळा इंडिया गेटवर बसवला जाईल, अशी घोषणा पंतप्रधानांनी शुक्रवारी केली होती. (parakram diwas 2022 prime minister narendra modi unveils hologram statue of netaji subhas chandra bose at india gate)

जोपर्यंत नेताजींचा ग्रॅनाइटचा पुतळा तयार होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी त्यांचा होलोग्राम पुतळा बसवला जाईल, असं ट्विट केलं होतं. या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते.

पंतप्रधान काय म्हणाले?

मोदींनी या कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्वांचे आभार मानले. भारतमातेचे शूर पुत्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी पंतप्रधानांनी हा काळ ऐतिहासिक असल्याचं नमूद केलं. नेताजींना भिक मागून स्वातंत्र्य मिळवणं मान्य नव्हतं, असं पंतप्रधान म्हणाले. 

तसेच आतापर्यंत देशाच्या संस्कृतीशी खेळ केल्याचं मोदींनी नमूद केलं. स्वातंत्र्याच्या अनेक महापुरुषांची उपेक्षा करण्यात आली. आधीच्या सरकारांनी केलेल्या चुका आम्ही सुधारत आहोत, असंही मोदींनी म्हणाले.

पाचव्या जॉर्ज यांच्या पुतळ्याच्या जागी नेताजींचा पुतळा

ब्रिटनचे किंग जॉर्ज पंचम यांचा पुतळा ज्या ठिकाणी स्थापित करण्यात आला होता त्याच ठिकाणी भारतमातेचे शूर पुत्र सुभाष चंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. 1968 मध्ये जॉर्ज पंचमचा पुतळा हटवण्यात आला.