काँग्रेसच्या चार खासदारांवर निलंबनाची कारवाई

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज काँग्रेसच्या चार खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. 

Updated: Jul 25, 2022, 04:51 PM IST
काँग्रेसच्या चार खासदारांवर निलंबनाची कारवाई  title=

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज काँग्रेसच्या चार खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिरसा यांनी ही कारवाई केली आहे. यासह लोकसभेचे कामकाज उद्या 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. 

 लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यापूर्वी आंदोलन न करण्याचा करण्याचा इशारा दिला होता. पण काँग्रेसच्या खासदारांनी हे आंदोलन सुरूच ठेवलं. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभेत फलक घेऊन महागाईविरोधात घोषणा दिल्याने त्यांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेस खासदार मणिकम टागोर, ज्योतिमणी, रम्या हरिदास आणि टीएन प्रतापन यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे.ओम बिरसा यांनी नियम ३७४ अन्वये काँग्रेसच्या चार खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे.