मेंदूवर शस्त्रक्रिया होताना त्याने चक्क पाहिला 'बाहुबली'...

काही दिवसांपूर्वी मेंदूचे ऑपरेशन करताना एक रुग्ण चक्क गिटार वाजतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एका ऑपरेशन दरम्यान रुग्णाला 'बाहूबली' चित्रपट दाखवून शस्त्रक्रिया  यशस्वी  करण्यात आली आहे. 

Updated: Oct 4, 2017, 10:15 AM IST
मेंदूवर शस्त्रक्रिया होताना त्याने चक्क पाहिला 'बाहुबली'...   title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी मेंदूचे ऑपरेशन करताना एक रुग्ण चक्क गिटार वाजतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एका ऑपरेशन दरम्यान रुग्णाला 'बाहूबली' चित्रपट दाखवून शस्त्रक्रिया  यशस्वी  करण्यात आली आहे. 

आंध्रप्रदेशातील गुंटूर येथील  मल्टी स्पेशॅलिटी हॉस्पिटल्समध्ये मेंदूच्या एका अवघड शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला बाहुबली चित्रपट दाखवून शुद्धीत ठेवले. 
DNA च्या रिपोर्टनुसार, ४३ वर्षीय विनया कुमारी या महिलेला सतत फीट्स येण्याचा त्रास होता. कालांतराने तिला ब्रेन ट्युमर असल्याचे निदान झाले. गुंटूर येथील तुलसी मल्टी स्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये २१ सप्टेंबर रोजी त्यांच्यावर  शस्त्रक्रिया पार पडली. 

मेंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला जागं राहणं गरजेचे असते. म्हणून डॉक्टरांनी बाहुबली दाखवण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णदेखील या चित्रपटाचा आनंद घेत होती, त्यामधील गाणी गुणगुणत होती. असे डॉक्टरांनी सांगितले आहे. 

"शस्त्रक्रिया सुमारे दीड तासाची होती. जर ही थोडावेळ अजून चालली असती तर कदाचित मला संपूर्ण चित्रपटाचा आनंद घेता आला असता' अशी प्रतिक्रिया या बाहुबली फॅन रुग्णाने दिली आहे.