तुम्ही ऑनलाइन पेमेंट करता? हे App होणार बंद

भारतात ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.   

Updated: Feb 5, 2021, 06:02 PM IST
तुम्ही ऑनलाइन पेमेंट करता? हे App होणार बंद title=

नवी दिल्ली : सध्या भरतात डिजिटल पेमेंटद्वारे (Digital Payment) व्यवहार करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. ग्राहकांमध्ये डिजिटल पेमेंटची असलेली पसंती लक्षात घेत अनेक मोठ्या कंपन्यांनी डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिलं. दरम्यान एका मोठ्या ऍपने भारतात त्यांची डिजिटल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जे ग्राहक या ऍपचा वापर व्यवहार करण्यासाठी करत आहेत, त्यांनी तात्काळ त्यांचं अकाउंट डिलीट करायला हवं, अशी प्रतिक्रिया तज्ज्ञांनी दिली आहे. 

डिजिटल व्यवहार करणारी Paypal ऍप त्यांची सेवा भारतात बंद करणार आहेत. म्हणजेच, आपण हे ऍप भारतात घरगुती खरेदीसाठी वापरू शकणार नाही. कंपनीने 1 एप्रिलपासून देशांतर्गत देय सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तुम्हाला आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी Paypal ऍपचा वापर करू शकता. 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुमचं Paypal ऍपवर अकाउंट असेल तर तुम्ही तुमचं अकाउंट डीऍक्टीव्हेट करू शकता. Paypal साईटवर जावून, सेटिंग्सवर क्लिक करा, त्यानंतर optionsमध्ये मोबाईल नं. टाकून Close Accountवर क्लिक करा. तुमचं अकाउंट डीऍक्टीव्हेट होईल. 

जर आपले खाते अशाप्रकारे डीऍक्टीव्हेट होत नसेल तर आपल्याला ईमेलद्वारे अकाउंट बंद करण्यास सांगितले जाऊ शकते. संपूर्ण जगात 190 देशांतील जवळपास  100 मिलियन मेंबर Paypalचा वापर दैनंदिन व्यवहारासाठी करतात.

भारतात Paypal ऍपचा वापर 2017 पासून होत  आहे. Paypalच्या मदतीने घरबसल्या सर्व व्यवहार करता येत होते. पण आता 1 एप्रिलपासून कंपनी ही सेवा बंद करणार आहे. पण Paypal ऍपच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यवहार करता येणार आहे.