गरबा खेळण्यासाठी मंडपात प्रवेश करण्याआधी प्यावं लागणार गोमूत्र; भाजपा नेता म्हणतो 'गैर हिंदू आमच्या...'

Navratri 2024: इंदोरमधील (Indore) भाजपा जिल्हाध्यक्षांनी नवरात्रीमध्ये (Navratri) गरबा खेळण्यासाठी मंडपात प्रवेश करताना काही नियम आखण्यास सांगितलं आहे. मंडपात प्रवेश करताना सर्वांना गोमूत्र (Gomutra) पाजून पाजलं पाहिजे असं ते म्हणाले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Oct 1, 2024, 12:21 PM IST
गरबा खेळण्यासाठी मंडपात प्रवेश करण्याआधी प्यावं लागणार गोमूत्र; भाजपा नेता म्हणतो 'गैर हिंदू आमच्या...'

Navratri 2024: पितृपक्ष संपताच नवरात्रीचा उत्सव सुरु होत आहे. नवरात्रीदरम्यान ठिकठिकाणी मंजप सजवले जातात. तरुणाईदेखील मंडपात जाऊन गरबा खेळण्यासाठी सज्ज असते. यादरम्यान मध्य प्रदेशच्या इंदोरमधून एक बातमी समोर आली आहे. येथे जिल्हाध्यक्षांनी गरब्याचं आयोजन करणाऱ्या आयोजकांना एक सल्ला दिला आहे. जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा यांनी, गरब्यासाठी मंडपात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गोमूत्र पाजलं पाहिजे असं ते म्हणाले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, हिंदूंचा गोमूत्र पिण्यात कोणताही आक्षेप नाही. इतकंच नाही तर टीळा न लावता आलेल्यांनाही गरबा मंडपता प्रवेश दिला जाऊ नये असंही ते म्हणाले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

चिंटू वर्मा यांचं हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यांनी सोमवारी सांगितलं की, गरबा मंडपात अनेक प्रकारचे लोक येत असतात. गर्दीमध्ये प्रत्येकाची ओळख पटवता येत नाही. यामुळे जे कोणी गरबा खेळण्यासाठी मंडपात येईल त्याला प्रवेश देण्याआधी गोमूत्र पाजलं पाहिजे. ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड पाहण्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले, आजकाल कोणीही बनावट आधार कार्ड बनवू शकतं. अशा स्थिती गैर हिंदूदेखील हिंदू मंडपात प्रवेश करतात. 

चिंटू वर्मा यांनी पुढे सांगितलं की, गरबा मातेचा उत्सव आहे. अशा स्थितीत मंडपात येणाऱ्या सर्वांनाच गोमूत्र पाजायला हवं. ते म्हणाले की, वेळोवेळी अशा चर्चा होत असतात की गर्दीतून काही लोक गोंधळ घालण्याच्या उद्धेशाने सहभागी होतात. त्यामुळे आपण पूर्वकाळजी घेणं गरजेचं आहे. 

कधी आहे शारदीय नवरात्र?

यावेळी शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 12.19 वाजेपासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:58 वाजेपर्यंत असणार आहे. अशा परिस्थितीत उदयतिथी नुसार 3 ऑक्टोबर 2024 रोजी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. तर 12 ऑक्टोबर 2024 पर्यंत नवरात्री असणार आहे.

दसरा मुहूर्त कधी आहे?

शनिवार, 12 ऑक्टोबर 2024 रोजी विजयादशमी म्हणजेच 'दसरा' आहे. या दिवशी विजय मुहूर्त दुपारी 02 वाजून 22 मिनिटांपासून ते 03 वाजून 09 मिनिटांपर्यंत आहे. हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More