नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये राजकारणाशी संबंधित एक प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये अंत्यसंस्कारासाठी आलेल्या व्यक्तींनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली. या प्रकार इतका दुर्दैवी होता की अनेकांना याचं भानच राहिलं नाही की ते आपण अंत्यसंस्काराला आले आहोत.
शाहजहांपूरमध्ये माजी राज्यमंत्री कोविद कुमार सिंह यांचा वृद्धापकाळाने निधन झालं. कोविद कुमार राजा भैया यांचे जुने सहकारी होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच राजा भैया स्मशान घाटला पोहोचले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकं उपस्थित होती. पण लोकं घटनेचं गांभीर्य विसरुन सेल्फी काढण्यासाठी गर्दी करु लागले.
सपाचे माजी मंत्री राममूर्ती सिंह वर्मा यांच्या शिवाय भाजप, सपा आणि बसपाचे नेते जेखील यावेळी उपस्थित होते. लोकांची अशी वर्तवणूक पाहता कोविद कुमार सिंह यांच्या कुटुंबियांना दु:ख झालं.