Goa News : भारतातील सर्वात फेमस टूरीस्ट डेस्टिनेशन म्हणजे गोवा. फक्त भारतातीलच नाही जगभरातील पर्यटक गोव्यात फिरण्यासाठी येतात. मात्र याच गोव्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोवा हे देशातील सर्वात बेरोजगार राज्य ठरले आहे. एका सर्वेच्या माध्यमातून देशातील बेरोजगार राज्यांची यादी समोर आली. या यादीनुसार गोव्यात सर्वात जास्त बेरोजरागी असल्याचे उघडकीस आले आहे.
पीरियडिक लेबर फोर्स सर्व्हे (PLFS) 2023-24 प्रसिद्ध झाला आहे. या सर्वेक्षणानुसार मध्य प्रदेश सारख्या मोठ्या राज्यात बेरोजगारीचा दर 1 टक्क्यांपेक्षा कमी असताना, गोव्यासारख्या छोट्या राज्यात बेरोजगारीचा दर सर्वाधिक आहे. गोव्यात बेरोजगारीचा दर 8.7 टक्के आहे. देशाच्या सरासरी 4.5 टक्क्यांच्या जवळपास दुप्पट आहे. 2022-23 मध्ये हा दर 9.7% होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 1 टक्के घट झाली आहे. सर्वेक्षणातून ही धक्कादायक आकेडवारी समोर आली आहे.
मागील वर्षी हरियाणातील बेरोजगारीचा दर 6.1 टक्के होता जो यावर्षी 3.4 टक्क्यांवर आला आहे. सर्वेक्षणानुसार, एका वर्षात 2.7 टक्के घट झाली आहे. देशताील इतर राज्यांशी तुलना करता हा सर्वाधिक आहे.
गोव्यातील नोकरदार महिलांची आकडेवारी देखील चिंतानजक आहे. महिलांचा बेरोजगारीचा दर 16.8 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, देशातील सरासरी 4.9 टक्के आहे. यासोबतच गोव्यातील कामगारांचा सहभागही राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. गोव्यात हे प्रमाण 39 टक्के आहे, तर संपूर्ण देशात 42.3 टक्के आहे.
गोवा राज्यातील बेरोजगारीची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. कॅश फॉर जॉब प्रकरण नुकतचं उघजकीस आले होते. याच मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते आणि गोवा फॉरवर्ड पार्टीचे आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. दक्षिण गोव्यातील मॅजिस्ट्रेट कार्यालयात क्लार्कची 92 पदे रिक्त होती. ही पदे भरण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली होती.
गोव्यात 55 टक्के लोक सेवा क्षेत्रात काम करतात, तर 19.7 टक्के कृषी क्षेत्रात आणि 30.5 टक्के इतर उद्योगांमध्ये काम करतात, परंतु ही क्षेत्रे नवीन नोकरी शोधणाऱ्यांना, विशेषतः तरुणांना आणि महिलांना काम देण्यात अपयशी ठरत असल्याचेही स्रवेक्षणातून समोर आले आहे.