GK Quiz : जगातला कोणता देश पृथ्वीच्या मध्यावर आहे? सांगा उत्तर

Trending Quiz : सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा पुन्हा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात इतिहास, भूगोल, विज्ञान, साहित्य, चालू घडामोडी आणि बऱ्याच घडामोडींवर प्रश्न आणि त्यांची उत्तरं आधारित आहेत. 

राजीव कासले | Updated: Sep 26, 2024, 10:06 PM IST
GK Quiz : जगातला कोणता देश पृथ्वीच्या मध्यावर आहे? सांगा उत्तर title=

Trending Quiz : उच्च शिक्षणाबरोबरच सामान्य ज्ञान असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत सामान्य ज्ञानाचे प्रश्न नक्कीच विचारले जातात. शाळा-कॉलेज प्रवेशासाठी परीक्षा असो किंवा सरकारी किंवा खासगी नोकरीसाठी लेखी परीक्षा असो, सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्न विचारले जातात. अनेक वेळा हे प्रश्नच आपल्याला माहित नसतात किंवा याची उत्तर आपल्याला येत नसतात.

म्हणूनच सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा पुन्हा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात इतिहास, भूगोल, विज्ञान, साहित्य, चालू घडामोडी आणि बऱ्याच घडामोडींवर प्रश्न आणि त्यांची उत्तरं आधारित आहेत.

प्रश्न - साप चावल्यास कोणत्या तीन गोष्टी प्रामुख्याने कराव्यात?

उत्तर - साप चावलेल्या व्यक्तीस छातीपासून खाली झोपण्यास सांगावं, शांत आणि स्थिर राहण्यास सांगवं, कोमट साबणाच्या पाण्याने जखम ताबडतोब धुवा. चावलेला भाग स्वच्छ, कोरड्या ड्रेसिंगने झाकून टाका (तज्ज्ञांचा सल्ला घ्या)

प्रश्न - कोणता पक्षी आरशात स्वत:ला पाहिल्यावर ओळखू शकतो?

उत्तर - कबतूर हा पक्षी आरशात स्वत:ला पाहिल्यावर ओळखू शकतो?

प्रश्न - थर्मामीटरचा शोध कोणत्या देशात झाला होता?

उत्तर - थर्मामीटरचा शोध इटलीचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांनी 1593 मध्ये लावला. गॅलिलिओ यांनी हवेचं तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरचा शोध लावला होता. त्यानंतर हवामान आणि शरीराचे तापमान मोजण्यासाठी अनेक प्रकारचे थर्मामीटर विकसित करण्यात आले.

प्रश्न - चिंचेचा चहा प्यायल्याने कोणता आजार बरा होतो?

उत्तर - चिंचेचा चहा प्यायल्याने मेटाबॉलिक सिंड्रोम बरा होतो, (उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

प्रश्न - मणुष्य प्राण्यानंतर सर्वात बुद्धिमान प्राणी कोणाला म्हणतात?

उत्तर - मणुष्य प्राण्यानंतर डॉल्फिनला सर्वात बुध्दिमान प्राणी मानला जातो.

प्रश्न - कच्चं लसूण खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो?

उत्तर - कच्चं लसूण खाल्ल्याने सर्दीचा आजार बरा होतो (उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

प्रश्न - जगातला कोणता देश पृथ्वीच्या मध्यावर आहे?

उत्तर - पृथ्वीच्या मध्यावर कोणताही देश नाही. शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीच्या केंद्रस्थानी 0°N 0°E आहे. असं असलं तरी आफ्रिका खंडातील घाना हा देश पृथ्वीच्या केंद्रस्थानापासूनचा सर्वात जवळचा देश मानला जातो. घाना हा देश पृथ्वीच्या केंद्र स्थानापासून केवळ 380 मील दूरीवर आहे.