दारुच्या नशेत त्याचा थेट 100 नंबरला फोन; म्हणाला मला 2 बॉटल बियर मिळेल का?

दारुच्या नशेत एका तरुणाने आश्चर्यजनक काम केले आहे. तेलंगना राज्यातील विकाराबाद येथील ही घटना आहे.

Updated: May 12, 2022, 09:32 AM IST
दारुच्या नशेत त्याचा थेट 100 नंबरला फोन; म्हणाला मला 2 बॉटल बियर मिळेल का? title=

नवी दिल्ली : सध्या दारुच्या नशेत कोण काय करेल याचा काहीही नेम नाही. अनेक लोक दारुच्या आहारी गेल्यामुळे नको नको ते कृत्य करताना नेहमीच आढळतात. याच दारुच्या नशेत एका तरुणाने आश्चर्यजनक काम केले आहे. तेलंगना राज्यातील विकाराबाद येथील ही घटना आहे. एका 22 वर्षीय तरुणाने पोलिसांनाच फोन करुन चक्क 2 बॉटल बियरची मागणी केली आहे.

हैदराबाद मधील दौलताबादचा मुळ निवासी असलेला मधू नामक या व्यक्तीने शुक्रवारी  रात्री 2:30 च्या सुमारास 100 नंबर डायल केला आणि म्हटले की, काही लोकांचा एक गट त्याच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. तशी त्याला धमकीही दिली आहे.

पोलीस घटनास्थळी तातडीने पोहचले तेव्हा तो व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता त्याने थेट पोलिसांना बिअरच्या दोन बाटल्या आणण्यास सांगितले. या व्यक्तीने आपल्याला फसवल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तत्काळ त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि काउंसलिंग करून सोडून दिले.

 याआधीही मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये अशीच एक घटना घडली होती. एका व्यक्तीने दारुच्या दोन बाटल्या पिऊनही नशा न झाल्याची लेखी तक्रार मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा आणि उत्पादन शुल्क विभागाकडे पाठवली होती. त्याने केलेल्या तक्रारीवर कोणतीही चौकशी झाली नाही, तेव्हा त्यांनी ग्राहक मंचाकडे जाणार असल्याही सांगितले होते.