मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कपात झाली आहे. मागच्या सात दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होत आहेत. आज मुंबईमध्ये पेट्रोल ८०.०६ रुपये प्रती लीटर तर डिझेल ६६.८१ रुपये प्रती लीटर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर घटल्यामुळे इंधनाच्या किंमती कमी झाल्या आहेत.
मागच्या एका आठवड्यामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये कपात होताना दिसत आहे. ११ मार्चला दिल्लीमध्ये पेट्रोल ७२ रुपये ४८ पैसे होतं. एका आठवड्यानंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ७२ रुपये १९ पैसे आहेत. म्हणजेच पेट्रोलच्या किंमतीमध्ये २९ पैशांची कपात झाली आहे.
पेट्रोलबरोबरच डिझेलच्या किंमतीही घटल्या आहेत. ११ मार्चला दिल्लीमध्ये डिझेलचे भाव ८९ पैसे प्रती लीटर होते. आज दिल्लीमध्ये डिझेल ६२ रुपये ७३ पैसे प्रती लीटर आहेत. म्हणजेच एका आठवड्यामध्ये डिझेलचे भाव १६ पैशांनी कमी झाले आहेत.