दिवाळीनंतर घसरला इंधनाचा दर, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजची किंमत

मंगळवारी सकाळी पेट्रोलच्या दरात ६ पैसे तर डिझेलमध्ये १० पैसे प्रति लीटर घट झाली

Updated: Oct 29, 2019, 09:43 AM IST
दिवाळीनंतर घसरला इंधनाचा दर, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजची किंमत

मुंबई : दिवाळीनंतर पेट्रोल - डिझेलच्या किंमतीत घसरण होताना दिसतेय. यापूर्वी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतरही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट झाल्याचं दिसून आलं होतं. मंगळवारी सकाळी पेट्रोलच्या दरात ६ पैसे तर डिझेलमध्ये १० पैसे प्रति लीटर घट झाली. 

मंगळवारी सकाळी भाव घसरल्यानंतर मुंबईत पेट्रोल ७८.५४ रुपये प्रति लीटर तर डिझेल ६९.०१ रुपये प्रति लीटरच्या स्तरावर दाखल झालंय. 
 
मंगळवारी दिल्ली पेट्रोल ७२.९२ रुपये प्रति लीटर तर डिझेल ६५.८५ रुपये प्रति लीटर उपलब्ध आहे.

तर कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल क्रमश: ७५.५७ रुपये, ७५.७३ रुपये प्रती लीटरवर दाखल झालंय. तर डिझेलचे दरही क्रमश: ६८.२१ रुपये प्रती लीटर आणि ६९.५६ रुपये प्रती लीटर आहे. 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नजिकच्या भविष्यातही कच्च्या तेलाच्या किंमतीत स्थिरता दिसून येईल. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत पेट्रोलच्या किंमतीत १.५० रुपये प्रती लीटर तर डिझेलच्या किंमतीत १.२५ रुपये प्रती लीटर घट झाल्याचं दिसून येतंय.