Petrol Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये होणारी वाढ काही केल्या थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. त्यातच रविवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले. आतापर्यंतचे उच्चांकी आकडे गाठणाऱ्या या दरवाढीने सर्वसामान्यांना घाम फोडला आहे. या दरवाढीचे थेट परिणाम इतरही जीवनावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये दिसू लागले आहेत.
रविवारी पेट्रोलच्या दरांमध्ये 35 पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 105.84 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, डिझेलचे दरही 35 पैशांनी वाढले आहेत. ज्यामुळं ही किंमत 94.57 रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईत पेट्रोल 111.77 रुपयांवर पोहोचलं आहे. इथं पेट्रोलच्या दरात 34 रुपयांनी वाढ नोंदवण्यात आला आहे. तर, डिझेलचे दर 102.52 प्रतीलीटर इतके झाले आहेत.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पूरी यांच्या वक्यव्यानुसार कोरोना काळापूर्वी इंधनाची मागणी इतकी नव्हती. पण, कोरोनानंतरच्या काळात मात्र या इंधनाचा खप वाढला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये स्थिरता आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं.