Petrol-Diesel Price Today: गाडीची टाकी फुल करायची आहे? जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price Today : सरकारी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. गेल्या 105 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तुमच्या शहरातील जाणून घ्या आजचे दर...  

Updated: Sep 4, 2022, 07:57 AM IST
Petrol-Diesel Price Today: गाडीची टाकी फुल करायची आहे?  जाणून घ्या आजचे दर  title=

Petrol-Diesel Price Today 4th September 2022: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतींमध्ये सध्या अनेक चढ-उतार सुरु आहेत. पेट्रोल-डिझेलच्याही (petrol-diesel) दरात चढ उतार दिसून येत आहेत. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे सुधारित दर जरी केले जातात.

याचदरम्यान  सरकारी तेल कंपन्यांनी आज (4 सप्टेंबर) पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. आज 106 व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, ही दिलासादायक बाब आहे. केंद्र सरकारने शेवटच्या वेळी 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. सध्या ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल $93 च्या आसपास आहे. 31 ऑगस्टपर्यंत ब्रेंट क्रूडची किंमत $104.43 होती. पण काही दिवसात ते सुमारे $11 ने घसरले आहे. आता ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल $ 93.39 वर आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊ शकते, असे मानले जात आहे.

वाचा : कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ होणार?, या राशींवर गणरायाची विशेष कृपा

 

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर काय आहे?

- मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर