Petrol-Diesel Price Today 26th September: गेल्या तीन महिन्यांपासून कच्च्या तेलात घसरण होत आहे. त्यात शेवटच्या दिवसांत विक्रमी घसरण झाली. मात्र देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे (petrol diesel rate) दर चार महिन्यांपासून त्याच पातळीवर आहेत. महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर राज्यात व्हॅट कमी करून जनतेला महागड्या पेट्रोलपासून दिलासा मिळाला. दुसरीकडे, मेघालयात गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर दीड रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती. (petrol diesel price today on 26th September 2022)
'या' शहरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर
देशातील प्रमुख महानगरांपैकी मुंबई, (mumbai petrol rate) दिल्ली आणि कोलकातामध्ये पेट्रोल-डिझेलचे (petrol-diesel rate) दर स्थिर आहेत. पण चेन्नईत मात्र पेट्रोल-डिझेलच्या दरांत काहीसा बदल झाला आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 11 पैशांनी महाग झालं असून सध्या एक लिटर पेट्रोलसाठी 102.74 रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिझेल 9 पैशांनी महागलं असून 94.33 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.
शहरं - पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर)- डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई - 106.31 रुपये - 94.27 रुपये
दिल्ली - 96.72 रुपये - 89.62 रुपये
चेन्नई - 102.74 रुपये - 94.33 रुपये
कोलकाता - 106.03 रुपये - 92.76 रुपये
कच्चे तेल विक्रमी नीचांकी पातळीवर जात आहे. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. मात्र कंपन्यांकडून दरात कोणतीही कपात करण्यात आली नाही. क्रूडचा दर प्रति बॅरल $80 च्या खाली आला आहे. WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 79.64 वर पोहोचली आहे. त्याच वेळी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 87.07 वर दिसले.
प्रमुख शहरांतील दर काय?
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
तर राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर 106.04 रुपये प्रति लिटर असून डिझेलचा दर 92.59 रुपये इतका आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 105.84 रुपये आणि डिझेलचा दर 92.36 रुपये प्रति लिटर इतका आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.47 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 93.01 रुपये प्रति लिटर इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 108 रुपये आणि डिझेलचा दर 95.96 प्रति लिटर इतका आहे. परभणीत पेट्रोलचा दर 109.41 रुपये आणि डिझेलचा दर 95.81 रुपये प्रति लिटर आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.
petrol diesel price today on 26th September 2022 sz