पेट्रोल-डिझेलचे दर थोडे स्थिरावले, हे आहेत आजचे दर

2019 मध्ये असे होते दर 

पेट्रोल-डिझेलचे दर थोडे स्थिरावले, हे आहेत आजचे दर  title=

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सोमवारी किंमतीत वाढ झाल्यामुळे मंगळवारी राजधानीसोबत इतर चार महागरांमध्ये दरात कमी झाली आहे. सोमवारी पेट्रोलच्या दरात 21 पैशांनी वाढ झाली होती मात्र मंगळवारी मात्र दर जुन्या स्तरावरच स्थिरावले. 

तर डिझेलचा दर 62.24 रुपये प्रती लीटर स्तरावर कायम राहिले. ग्लोबल मार्केटमध्ये कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ होऊन भविष्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊ शकते. 

मंगळवारी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चैन्नईमध्ये पेट्रोलचे दर जुन्या दराने म्हणजे क्रमशः 68.50 रुपये, 70.64 रुपये, 74.16 रुपये आणि 71.07 रुपये प्रती लीटरवर कायम आहे. 

7 जानेवारीला पहिल्यांदा वाढली किंमत 

2019 या नवीन वर्षात 7 जानेवारीला पेट्रोलचा दर वाढला. दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये डिझेलचे दर क्रमशः 62.24 रुपये, 64.01 रुपये, 65.12 रुपये आणि 65.70 रुपये प्रति लीटर आहेत. 1 जानेवारीला पेट्रोलच्या दरात 19 पैशांनी कपात झाली आहे. 

2 आणि 3 जानेवारीला काहीच बदल झाला नाही. लेकिन, चार जानेवारीला 21 पैसे आणि 5 जानेवारीला 15 पैसे प्रती लीटर स्वस्त झालं आहे. यानंतर 6 जानेवारीला हा दर स्थिरावला. पण 7 जानेवारीला किंमतीत पहिल्यांदा वाढ झाली. त्यानंतर 8 जानेवारीला पेट्रोल आणि डिझेलचे दर पूर्ववत होते. 

येणाऱ्या दिवसांत वाढणार दर 

पुढील काही दिवसांत कच्चा तेलांच्या किंमतीत वाढ होऊ शकते. 25 डिसेंबर 2018 ला 50 डॉलर प्रती बॅरलपर्यंत पोहोचणारा ब्रेंट क्रूड यावेळी 57.56 डॉलर प्रती बॅरलच्या स्तरापर्यंत पोहोचला आहे. यामुळे पुढील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ होऊ शकते.