मुंबई : पाच दिवसांच्या स्थिरतेनंतर अखेर मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाली आहे. मंगळवारी सकाळी दिल्लीमध्ये पट्रोलच्या दरात ५ पैसे प्रती लीटर घट झाली तर डिझेलच्या किंमतीत ६ पैसे प्रती लीटर घसरणीची नोंद झाली. तर दिल्लीत आज पेट्रोलचे दर ७३.२२ रूपये आणि डिझेलचे दर ६६.११ रुपये प्रती लीटर दर पाहायला मिळत आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला पेट्रोलच्या दरात १.२५ प्रती लीटर घट झाली आहे. तर डिझेलच्या दरात १ रूपयाची घट झाली आहे. आज कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर क्रमश: ७५.८६, ७८.८३, ७६.०५ असे आहेत.
तर डिझेलचे दर सुद्धा क्रमश: ६८.४७, ६९.२९ आणि ६९.८४ असे आहेत. सौदी अरामकोवर झालेल्या हल्ल्यानंतर काही दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरात जवळपास दिड रूपायांची वाढ झाली. तर डिझेल देखील दिड रूपयांनी वाढले होते.