ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये ये-जा करण्याची परवानगी, जाणून घ्या पेट्रोलचे दर

देशातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवला आहे.  

Updated: May 2, 2020, 03:37 PM IST
ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये  ये-जा करण्याची परवानगी, जाणून घ्या पेट्रोलचे दर  title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत देशातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवला आहे. पण मोदींनी ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये लॉकडाऊनचे काही नियम शिथिल केले आहेत. तर आता ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील व्यक्ती बाहेर ये-जा करू शकतील. शिवाय,  याठिकाणी कार आणि दुचाकी वाहनांना परवानगी दिली आहे. त्यामुळे जवळपास महिनाभर बंद असलेली वाहने आता ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये फिरू शकतात. त्यामुळे पेट्रोलचं दर माहिती असणं तितकच महत्त्वाचं आहे. 
 
इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार आजचे पेट्रोलचे दर 
दिल्ली : ६९.५९ प्रती लिटर 
मुंबई : ७६.३१  प्रती लिटर 
कोलकाता : ७३.३०  प्रती लिटर 
चेन्नई : ७२. २८  प्रती लिटर 

डिझेलचे दर 
दिल्ली : ६२.२९  प्रती लिटर  
मुंबई : ६६.२१  प्रती लिटर 
कोलकाता : ६५.६२  प्रती लिटर 
चेन्नई : ६५.७१  प्रती लिटर