Petrol Price : एका वर्षात 21 रुपयांनी महाग झाले पेट्रोल! आतापर्यंतचा किमतीचा रेकॉर्ड

Petrol Price Today 19 May 2021: पेट्रोलची किंमत आज पुन्हा वाढलेली दिसून येत आहे. एका  पेट्रोल 21 रुपयांनी महाग झाले झाले आहे.  

Updated: May 19, 2021, 09:41 AM IST
Petrol Price : एका वर्षात 21 रुपयांनी महाग झाले पेट्रोल! आतापर्यंतचा किमतीचा रेकॉर्ड title=

मुंबई :  Petrol Price Today 19 May 2021: पेट्रोलची किंमत आज पुन्हा वाढलेली दिसून येत आहे. एका  पेट्रोल 21 रुपयांनी महाग झाले झाले आहे. हा आतापर्यंचा विक्रम आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता वाढत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हाच प्रकार दिसून येत आहे. तथापि, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींची किंमत ही आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर अर्थात महागाईच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 99 रुपयांच्या पुढे गेला आहे.

मे महिन्यामध्ये किंमती 10 वेळा वाढल्या

4 मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सलग चार दिवस वाढ करण्यात आली, तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती निवडणुकांमुळे पहिले 18 दिवस किंमत  वाढत आहेत. मेमध्ये पेट्रोल आणि डिझेल 10 वेळा महाग झाले आहेत. मे महिन्यात आतापर्यंत दिल्लीत पेट्रोलचे दर 2.45 रुपयांनी वाढले आहेत तर डिझेल या महिन्यात 2.78 रुपयांनी महागले आहे.

दिवसेंदिवस देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी पातळी गाठत आहेत. मार्च-एप्रिलमध्ये किरकोळ इंधन दरामध्ये जास्त दरवाढ झाली नाही. परंतु आता तेलाच्या किंमती वाढविण्यात आल्या. सर्व मेट्रो शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल विक्रमी दराने विकले जात आहेत. दरम्यान, आज (बुधवार) इंधनाच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.  मंगळवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 27 पैसे आणि डिझेलच्या किंमती 29 पैशांनी वाढ झाली होती.

दिल्लीत पेट्रोलची किंमत 92.85 रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे. त्याचबरोबर डिझेल प्रति लिटर 83.31 रुपये झाले आहे. मुंबईत विक्रमी वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल 99.14 रुपये प्रतिलिटर तर डिझेल ९०.७१ रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 94.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 88.34 रुपये प्रति लिटर विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 92.92 रुपये तर डिझेलची किंमत 86.35 रुपये प्रतिलिटर झाली आहे.

मंगळवारी कच्चा तेलाच्या किंमती मार्चमध्ये झालेल्या वाढीपेक्षा अधिक होत्या. 15 मार्चनंतर प्रथमच ब्रेंट क्रूड तेलाची किंमत 70 डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त झाली होती. त्यानंतर काल वाढ झाली होती. पण आज किंमती स्थिर आहेत.या दहा दिवसांच्या वाढीनंतर देशातील बर्‍याच राज्यात पेट्रोल 100 च्या वर गेले आहे. 

राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील बर्‍याच शहरांमध्ये यापूर्वीच किंमतींनी 100 रुपयांची मर्यादा ओलांडली होती आणि कालच्या वाढीसह मुंबईतील किंमतही 100  रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे.  राजस्थानमध्ये पेट्रोलवर सर्वाधिक मूल्य वर्धित कर आहे. त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र, राजस्थानातील श्रीगंगानगर जिल्ह्यातील देशातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 103.80 रुपये आणि 96.30 रुपये प्रति लिटर विकले जात आहेत.