Petrol Diesel Price : पेट्रोल 18 तर डिझेल 11 रुपयांनी स्वस्त होणार, अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा!

Today Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल आता कधी स्वस्त होणार? असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. जरी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती घसरलेल्या असल्या तरी अच्छे दिन येणार तरी कधी? 

Updated: Feb 28, 2023, 12:32 PM IST
Petrol Diesel Price  : पेट्रोल 18 तर डिझेल 11 रुपयांनी स्वस्त होणार, अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा!  title=
Petrol will be cheaper by 18 rupees and diesel by 11 rupees

Today Petrol Diesel Price: मागील वर्षापासून देशातील पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel Price) दरात चढ-उतार होताना दिसत आहे. तर गेल्या 10 महिन्यांपासून सर्वसामान्यांना इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला दिसत नाही. महागड्या इंधन दरामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून गेले आहे. मात्र अशातच अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत दिलासा देणारी बातमी दिली. 

गेल्या नऊ महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel Price) दर स्थिर आहेत. पण आजही अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांपेक्षा जास्त विकले जाते. मात्र आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यानंतर सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात होऊ शकते, असे संकेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी दिले आहेत. त्यानुसार पेट्रोल 18 रुपयांनी तर डिझेल 11 रुपयांनी कमी होऊ शकते. त्यासाठी केंद्र सरकारकडून मोठे नियोजन केले जात असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. 

वाचा: आदिती राव हैदर व सिद्धार्थ अडकणार लग्नबंधणात? 'या' व्हिडीओमुळे चर्चेला उधाण 

अशी असेल सरकारची योजना?

अर्थमंत्र्यांनी असेही म्हटले होते की,  सरकार दर 15 दिवसांनी कच्चे तेल, डिझेल-पेट्रोल आणि जेट इंधनावरील नवीन कराचा आढावा घेण्यात येईल. तसेच केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार करत आहे. सध्या जीएसटी कौन्सिलमध्ये यावर चर्चा होणार आहे. यावर राज्य सरकारांकडून करार झाला तर तेलाच्या किमतीत मोठी घसरण होऊ शकते. सध्या इंधनावर 28 टक्के दराने कर आकारला जातो. 

दरम्यान फेब्रुवारीच्या सुरूवातीला पेट्रोलची विक्री सुमारे 18 टक्क्यांनी वाढून 12.2 लाख टन झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा 10.4 लाख टन होता. हा आकडा 2021 च्या फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत 18.3 टक्के अधिक आहे. 

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

घरबसल्या चेक करा नवे  दर 

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.