'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' पुस्तकाची वादग्रस्त पानं 'झी २४ तास'वर

नरेंद्र मोदी आणि शिवाजी महाराज यांच्यातील शारीरिक समानतेबद्दल लेखकानं पहिल्या पानावर लिहिलंय

Updated: Jan 14, 2020, 08:45 AM IST
'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' पुस्तकाची वादग्रस्त पानं 'झी २४ तास'वर title=

नवी दिल्ली : 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या वादग्रस्त पुस्तकाताची पानं 'झी २४ तास'च्या हाती लागली आहेत. पहिल्याच पानावर सुरुवातीलाच शिवाजी महाराज आणि मोदींच्या शरीरयष्टीपासून करण्यात आलीय. यात नरेंद्र मोदी आणि शिवाजी महाराज यांच्यातील शारीरिक समानतेबद्दल लेखकानं लिहिलंय तर डाव्या बाजूला शिवाजी महाराज आणि मोदी यांची शारीरिक समानता दाखवणारे रेखाचित्र दिलंय. यात लेखक जय भगवान गोयल म्हणतात की, 'मोदी आणि शिवाजी महाराज यांची शरीरयष्टी समान होती. शिवाजी महाराज मध्यम उंचीचे होते तसेच हुबेहुब नरेंद्र मोदी मध्यम उंचीचे असल्याचा' शोध लेखकानं लावलाय. 


आज के शिवाजी-नरेंद्र मोदी

 

दरम्यान, भाजप नेते जयभगवान गोयल यांनी लिहिलेल्या 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकावरुन निर्माण झालेल्या वादावर भाजपनं पडदा टाकलाय. 'छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना इतर कुणाशीही होऊच शकत नाही.
हे पुस्तक जय भगवान गोयल यांचं व्यक्तिगत लिखाण आहे; पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नाही', असं भाजपचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं आहे.


प्रकाश जावडेकर यांचं ट्विट 

 

इतकंच नाही तर पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी माफी मागितली असून 'हे पुस्तक मागे घेतले आहे' असं सांगत जावडेकर यांनी या पुस्तकामुळे निर्माण झालेल्या पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.