PM Kisan FPO Yojana | केंद्र सरकार शेतकऱ्यांना देतेय 15 लाखांची मदत, आत्ताच अर्ज करा

केंद्र सरकार (Central Government) शेतकऱ्यांसाठी सातत्याने योजना आणत असते.   

Updated: Aug 18, 2021, 07:47 PM IST
PM Kisan FPO Yojana | केंद्र सरकार शेतकऱ्यांना देतेय 15 लाखांची मदत, आत्ताच अर्ज करा title=

मुंबई : केंद्र सरकार (Central Government) शेतकऱ्यांसाठी सातत्याने योजना आणत असते. आता सरकार शेतकऱ्यांचं उतपन्न वाढवण्याच्या दृष्टीने कृषी विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. यानंतर कृषी क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी सरकार शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट देत आहे. शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राशी व्यवसाय सुरु करण्यासाठी 15 लाख रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. केंद्र सरकारची ही नक्की काय योजना आहे, ही आर्थिक मदत मिळवण्यासाठी काय करावं लागेल, हे आपण जाणून घेऊयात. (PM Kisan FPO Yojana Government is giving Rs 15 lakh help to farmers, apply immediately Know the process here)   

...असे मिळणार 15 लाख

सरकारने पीएम किसान एफपीओ या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेनुसार, शेतकरी उत्पादक संघटनेला (Farmers Producers Organization) 15 लाख रुपये दिले जाणार आहेत. देशातील शेतकऱ्यांना नव्याने कृषी आधारित उद्योग सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडून ही आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 11 शेतकऱ्यांना एकत्र येत एक संघटना किंवा कंपनी सुरु करायला लागेल. यामुळे शेतकऱ्यांना कृषी शेतीशी संबंधित उपकरणं, फर्टीलायझर्स, बियाणं यासारख्या वस्तू खरेदी करणं सोयीस्कर होईल.

योजनेचं उद्देश काय?  

शेतकऱ्यांना थेट फायदा व्हावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याच हेतुने सरकारने या योजनेची सुरुवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दलालाकडे जावं लागणार नाही. शेतकऱ्यांना या योजनेनुसार, शेतकऱ्यांना 3 वर्षांमध्ये हफत्यात ही रक्कम दिली जाणार आहे. यासाठी 2024 पर्यंत 6 हजार 885 कोटी रुपये सरकारकडून खर्च केले जाणार आहेत.
 
योजनेसाठी अर्ज कसा करायचा?  

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे. सरकारने आतापर्यंत या योजनेसाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु केलेली नाही. लवकरच नोंदणी प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन करता येणार आहे. सरकारनुसार, लवकरच या योजनेची अधिसूचना काढण्यात येणार आहे.