PM Kisan Refund List | अपात्र शेतकरी असाल तर परत करावी लागेल रक्कम; यादीत तुमचे नाव नाही ना? करा चेक

त्या शेतकऱ्यांकडूनही रक्कम परत वसुल करणे सुरू झाले आहे. ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा फायदा घेतला आहे. 

Updated: Nov 16, 2021, 11:47 AM IST
PM Kisan Refund List | अपात्र शेतकरी असाल तर परत करावी लागेल रक्कम; यादीत तुमचे नाव नाही ना? करा चेक title=

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आता 10 वा हफ्ता जारी होणार आहे. त्यासोबतच आता त्या शेतकऱ्यांकडूनही रक्कम परत वसुल करणे सुरू झाले आहे. ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा फायदा घेतला आहे. आता या बनावटगीरी विरोधात सरकार ऍक्शन मोड आहे. अपात्र शेतकऱ्यांनी रिफंड करण्यासाठी पीएम किसान स्किम अंतर्गत शेतकऱ्यांची लिस्ट जारी करण्यात आली आहे. या लिस्टमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला पैसे परत करावे लागतील.

पीएम किसान योजनेअंतर्गत फसवणूकीची प्रकरणे
केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत फसवणूकीची प्रकरणे समोर आली आहेत. बिहार सरकारने हा गंभीर मुद्दा मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या अपात्र शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत आपली नोंदणी केली आहे. त्यांना केंद्र आणि राज्य सरकारांना पैसे परत करावे लागणार आहे.

पीएम किसानची रिफंड लिस्ट
शेतकऱ्यांसाठी ही योजना पारदर्शक बनवण्यासाठी डीबीटी वेबसाईट बनवण्यात आली आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे असतील त्यांना सरकारला पैसे परत करावे लागतील. 

अशा पद्धतीने रिटर्न लिस्ट करा चेक
- पंतप्रधान किसान सम्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्याpmkisan.gov.in
- आता  होम पेजवर अपात्र श्रेणी, शेतकऱ्यांचे नाव, नोंदणी संख्या, लिंग, राज्य, ब्लॉक, जिल्हा, हफ्ता रक्कम, रिफंड मोड आणि बँकेच्या खात्याचे विवरण भरा.
- विवरण नोंदवल्यानंतर यादी स्क्रीनवर दिसून येईल. 
- या यादीत आपले नाव आहे का त्याचा शोध घ्या.
- जर यादीत आपले नाव असले तर, योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम परत द्यावी लागेल.

PM Kisan, PM Kisan Samman Nidhi Yojana, Farmers Income, Pm Kisan Money Transfer,