पंतप्रधान मोदींनी या ७ गोष्टींबाबत मागितली नागरिकांकडून साथ

पंतप्रधान मोदींकडून पुन्हा लॉकडाऊन २ ची घोषणा

Updated: Apr 14, 2020, 10:33 AM IST
पंतप्रधान मोदींनी या ७ गोष्टींबाबत मागितली नागरिकांकडून साथ title=

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदीेंनी आज देशाला संबोधित करत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाचे गोष्टी देशवासियांपुढे मांडल्या. त्यांनी देशातील नागरिकांना साथ देण्याचं आवाहन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संबोधन

- कोरोनाच्या विरोधात भारताची लढाई मजबुतीने पुढे जात आहे. सर्व देशवासीयांच्या त्याग मुळे भारत आतापर्यंत कोरोनामुळे होणारं नुकसान टाळण्यात यशस्वी झाला आहे. तुम्हा कष्ट सहन करुन देशाला वाचवलं आहे. तुम्हाला अनेक अडचणी आल्या आहेत.

- काही जण घर, परिवारापासून दूर आहेत. तुम्ही देशासाठी सैनिकाप्रमाणे कर्तव्य पार पाडत आहेत. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करतो. बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी आपल्या सामुहिश शक्तीचं प्रदर्शन बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली आहे. मी सगळ्या देशवासियांकडून बाबासाहेबांना नमन करतो.

- देशातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या सणांचे दिवस आहेत. अनेक राज्यामध्ये नव्या वर्षाची सुरुवात होत आहे. देशातील लोकं नियमांचं पालन करत आहेत. घरात राहून सण साजरे करत आहेत. हे सर्व प्रेरणादायी आहे. मी तुमच्यासाठी उत्तम आरोग्याची प्रार्थना करतो.

- जगातील कोरोनाच्या स्थितीची सगळेच परिचित आहेत. भारतात याला आळा घालण्यात आपण यशस्वी होत आहोत. कोरोनाचे रुग्ण १०० पर्यंत पोहोचण्याआधीच १४ दिवसांचं आयसोलेशन सुरु करण्यात आलं होतं. आपल्याकडे ५०० रुग्ण झाले तेव्हा आपण लॉकडाऊनचा मोठा निर्णय घेतला.

- या संकाटात कोणत्याच देशासोबत तुलना करणं योग्य नाही. पण सत्य हे आहे की जगातील बलवान देशांच्या तुलनेत भारत खूपच चांगल्या स्थितीत आहे. कोरोना संक्रमणाने अनेक देशात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. भारताने जलद निर्णय़ नसते घेतले तर काय स्थिती असती याबाबत विचार केला तरी अंगावर शहारे उभे राहतात.

- सध्या हीच स्थिती आपल्यासाठी योग्य आहे, लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचा मोठा फायदा झाला आहे. आर्थिकदृष्ट्या हे महाग आहे पण नागरिकांच्या जीवाच्या पुढे याची किंमत नाही होऊ शकत. भारत ज्या मार्गावर आहे त्याची चर्चा जगभरात होणं स्वाभाविक आहे.

- राज्य सरकारने देखील जबाबदारीने काम केलं आहे. प्रत्येकांने जबाबदारी पार पाडली आहे. पण या सर्व प्रयत्नांमध्ये कोरोना ज्या प्रकार पसरत आहे. त्यामुळे सरकारला आणखी सतर्क केले आहे. आपण विजयी कसे होऊ. नुकसान कसं कमी होईल. लोकांच्या अडचणी कशा दूर होतील याबाबत राज्यांसोबत चर्चा केली. सगळ्यांनी लॉकडाऊन वाढवण्याबाबत सल्ला दिला आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवावा लागेल.

- २० एप्रिलपर्यंत प्रत्येक ठिकाणावर लक्ष राहिल. ज्या क्षेत्रात कोरोनावर मात केली जाईल. जेथे कोणताही धोका नसेल तेथे काही प्रमाणात दिलासा दिला जाईल. पण लॉकडाऊनमध्ये कठोर कारवाई केली जाईल.

- भारतात १ लाख बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. ६०० रुग्णालयांमध्ये फक्त कोरोनावर उपचार होतील. 

- भारतातील वैज्ञानिकांना आवाहन आहे, की तुम्ही पुढे आहे. कोरोनावर औषध शोधण्यासाठी देशातील युवा वैज्ञानिकांनी पुढे यावं.

- मी तुमची साथ मागत आहे. ७ गोष्टींमध्ये मी तुमची साथ मागत आहे.

१. घरातील वृद्धांची विशेष काळजी घ्या. ज्यांना कोणताही आजार आहे अशा लोकांची अधिक काळजी घ्यायची आहे.

२. लॉकड़ाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचं पालन करा. घरात बनवलेल्या मास्कचा वापर करा

३. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या नियमांचं पालन करा.

४. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करा. त्यांच्या सूचनांचं पालन करा.

५. गरीब लोकांना मदत करा. त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा.

६. व्यवसाय, उद्योगात तुमच्या सोबत काम करणाऱ्या लोकांना कामावरुन काढू नका

७. कोरोना योद्धा असलेले पोलीस, डॉक्टर,शासकीय कर्मचारी यांचा आदर आणि सन्मान करा.

या ७ गोष्टींमध्ये मी तुमची साथ मागत आहे. विजय होण्यासाठी संपूर्ण निष्टेने याचं पालन करा. जेथे आहात तेथे सुरक्षित राहा.