कितीही काळी जादू केली तरी कॉंग्रेसवर लोकांचा विश्वास बसणार नाही : नरेंद्र मोदी

'या लोकांना वाटतं की, काळे कपडे परिधान केल्याने त्यांची निराशा आणि हताशाची वेळ समाप्त होईल. परंतू त्यांना माहित नाही की, त्यांनी कितीही झाड-फूंक केली, कितीही काळी जादू केली तरी जनतेचा त्यांच्यावर आता पुन्हा विश्वास बसणार नाही.' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर टीका करताना म्हटलं.

Updated: Aug 12, 2022, 09:37 AM IST
कितीही काळी जादू केली तरी कॉंग्रेसवर लोकांचा विश्वास बसणार नाही : नरेंद्र मोदी title=

पानीपत : 'या लोकांना वाटतं की, काळे कपडे परिधान केल्याने त्यांची निराशा आणि हताशाची वेळ समाप्त होईल. परंतू त्यांना माहित नाही की, त्यांनी कितीही झाड-फूंक केली, कितीही काळी जादू केली तरी जनतेचा त्यांच्यावर आता पुन्हा विश्वास बसणार नाही.' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर टीका करताना म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पानीपतमध्ये इंडियन ऑईलच्या द्वितीय जनरेशनच्या  इथेनॉल संयंत्राचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उद्घाटन केले. यावेळी बोलतांना त्यांनी कॉंग्रेसवर टीका केली. 
आपल्या देशातील काही लोकं नकारात्मकतेत फसले आहेत. निराशेच्या गर्तेत अडकले आहेत. सरकारवर केलेल्या खोट्या टीकांवर लोकं विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे आता हे लोकं काळ्या जादूकडे वळताना दिसत आहेत.

उद्घाटनानंतर केलेल्या संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, आताच तुम्ही पाहिलं की, 5 ऑगस्टरोजी कशा पद्धतीने काळी जादू पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. 
या लोकांना वाटतं की, काळे कपडे परिधान केल्याने त्यांची निराशा आणि हताशाची वेळ समाप्त होईल. परंतू त्यांना माहित नाही की, त्यांनी कितीही झाड-फूंक केली, कितीही काळी जादू केली तरी जनतेचा त्यांच्यावर आता पुन्हा विश्वास बसणार नाही.

5 ऑगस्ट रोजी काँग्रेसने महागाईच्या मुद्द्यावर निदर्शने केली. यावेळी राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी काळे कपडे परिधान केले होते. दिल्लीत संसदेजवळ आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर त्यांना 6 तासांनंतर सोडून देण्यात आले.