Nokia मोबाईलची पुन्हा धमाकेदार एन्ट्री! एकदम तगडा 5G Smartphone, मोठा बॅटरी बॅकअप आणि जबरदस्त लूक

Nokia Smartphone : नोकिया बाजारात पुन्हा धमाका करण्याची तयारी करीत आहे. नोकिया नेक्स्ट सीरीजचा फोन आणत आहे. हा  5G Smartphone असणार आहे. तो एकदम तगडा असणार आहे.  

Updated: Aug 12, 2022, 09:23 AM IST
Nokia मोबाईलची पुन्हा धमाकेदार एन्ट्री! एकदम तगडा 5G Smartphone, मोठा बॅटरी बॅकअप आणि जबरदस्त लूक  title=

मुंबई : Nokia Smartphone : नोकिया बाजारात पुन्हा धमाका करण्याची तयारी करीत आहे. नोकिया नेक्स्ट सीरीजचा फोन आणत आहे. हा  5G Smartphone असणार आहे. तो एकदम तगडा असणार आहे. या मोबाईलमध्ये मोठा बॅटरी बॅकअप असून लूकही एकदम मस्त आहे. याचे काही फीचर्स लीक झाले आहेत.

Nokiaचा हा Smartphone 2022 च्या उत्तरार्धात बाजारात दाखल होईल. Nokia X आणि G सीरीज 5G स्मार्टफोन लॉन्च केले जातील ,अशी बातमी हाती आली होती. आता, Nokia X30 5G आणि Nokia G80 5G चे फीचर्स लीक झाले आहेत. 

 Nokia G80 5G 

लीक व्यतिरिक्त, Nokia G80 5G अर्थात ​​Nokia Apollo देखील FCC प्रमाणपत्रात अलीकडेच समोर आला आहे. FCC प्रमाणपत्राने TA-1479, TA-1481, TA-1490, TA-1475 ची Nokia G80 5G चा प्रकार म्हणून पुष्टी केली गेली आहे.

Nokia G80 5G Specifications

FCC सर्टिफिकेशनमधील लेबलने सूचित केल्याप्रमाणे, Nokia G80 5G मागील बाजूस ट्रिपल-कॅमेरा असू शकतो. Nokia G21 वर वापरलेले एक नवीन कॅमेरा मॉड्यूल असू शकते आणि ते एक चांगले असेल असे सांगण्यात येत आहे. TA-1490 आणि TA-1475 हे सिंगल-सिमचा मोबाईल आहे. तर TA-1479 आणि TA-1481 हे ड्युअल-सिम प्रकारात मोबाईल उपलब्ध असणार आहे.

Nokia G80 5G बॅटरी

Nokia G80 5G मध्ये 4500mAh बॅटरी असेल. Nokia Mobiles मधील अनेक आगामी 5G स्मार्टफोन Snapdragon 480 Plus 5G प्रोसेसरवर आधारित आहे. खरं तर, एचएमडी ग्लोबलने प्रेस रिलीजमध्ये त्याच्या भविष्यातील स्मार्टफोनसाठी क्वालकॉमचा विचार केला जात असल्याचे म्हटले आहे.