राहुल गांधींच्या या वक्तव्यावर मोदी जोरजोरात हसले

राहुल गांधींच्या वक्तव्यावर मोदींना हसू अनावर

Updated: Jul 20, 2018, 02:57 PM IST
राहुल गांधींच्या या वक्तव्यावर मोदी जोरजोरात हसले title=

नवी दिल्ली : काँग्रेस आणि टीडीपी यांच्याद्वारे लोकसभेत आणलेल्या मोदी सरकार विरुद्ध अविश्वास ठरावावर चर्चेची सुरुवात टीडीपी खासदार जयराज गाला यांनी केली. त्यांनी यावेळी आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत मोदी सरकारवर टीका केली. यावर भाजप खासदार राकेश सिंह यांनी त्यांना उत्तर दिलं. त्यानंतर काँग्रेसकडून पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बोलायला सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीपासूनच मोदी सरकारवर टीका करायला सुरुवात केली.

रोजगार, नोटबंदी, जीएसटी अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. यावेळी राहुल गांधींच्या भाषणावर अनेकदा सगळ्यांना हसू सूटलं. पंतप्रधान मोदी देखील या दरम्यान हसतांना दिसले. राहुल गांधींनी पंतप्रधानाच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी म्हटलं की, तुम्ही अमेरिकेला जातात, बराक ओबामांना भेटतात, ट्रम्प यांना भेटतात. राहुल यांच्या या वक्तव्यानंतर मोदींना हसू आलं.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदीवर टीका करत म्हटलं की, 'आता पीएम मोदी ईमानदार नाही राहिले. त्यामुळे ते माझ्याशी डोळे मिळवू शकत नाही आहेत. संपूर्ण देशाने पाहिलं आहे की, मी स्पष्टपणे बोललो आहे. त्यामुळे मोदी माझ्याशी नजर मिळवू शकत नाही आहेत. या वक्तव्यानंतर ही पंतप्रधान जोरजोरात हसू लागले.