पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी पंतप्रधान मोदी आसामला रवाना

पीएम नरेंद्र मोदी आसाममधील पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी आसामला रवाना झाले आहेत. पीएम मोदी या दरम्यान एक उच्च स्तरीय बैठक देखील घेणार आहेत. य़ामध्ये पूर्वेकडील राज्य खासकरुन आसाम, अरूणाचल प्रदेश, नगालँड आणि मणिपूरमध्ये सुरु असलेल्या मदतकार्याचा अहवाल घेतला जाणार आहे. बैठकीत या राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहे.

Updated: Aug 1, 2017, 10:38 AM IST
पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी पंतप्रधान मोदी आसामला रवाना title=

नवी दिल्ली : पीएम नरेंद्र मोदी आसाममधील पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी आसामला रवाना झाले आहेत. पीएम मोदी या दरम्यान एक उच्च स्तरीय बैठक देखील घेणार आहेत. य़ामध्ये पूर्वेकडील राज्य खासकरुन आसाम, अरूणाचल प्रदेश, नगालँड आणि मणिपूरमध्ये सुरु असलेल्या मदतकार्याचा अहवाल घेतला जाणार आहे. बैठकीत या राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहे.

याआधी सोमवारी पीएम मोदींनी पूरग्रस्तांसाठी २-२ लाखांच्या मदतीची घोषणा केली होती. पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं की, मोदींनी राज्यातील पूरामुळे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींसाठी 50,000 रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.